उर्वरित महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीजोड प्रकल्प हाती घेणे आवश्यक
xtreme2day
14-08-2025 22:02:04
19348054
उर्वरित महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीजोड प्रकल्प हाती घेणे आवश्यक
जलतज्ञ रामचंद्र पिल्दे यांचे मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा मंत्री श्री.गिरीशजी महाजन यांच्याकडे रिपोर्ट आणि निवेदन सादर

छत्रपती संभाजी नगर (विशेष प्रतिनिधी) - भारताचे पूर्व पंतप्रधान कै.श्री. अटलबिहारी वाजपेयी साहेब यांच्या स्वप्नातील भारताचा विविध नद्याजोड प्रकल्प साकार करण्याची वेळ आता आली आहे, परंतु राज्यातून राष्ट्रीय नद्यांवर कोणताही अभ्यास शासनाच्या वतीने nwda कडे सादर झाला नाही, तो सादर करणे अत्यंत गरजेचे आहे, या करता ब्रह्मपुत्र नदीजोड प्रकल्प लवकरात लवकर कसा हाती घेणे शक्य होणार आहे, तसेच ब्रह्मपुत्र नदीचे पाणी विविध राज्यांमधून रांची राज्य पर्यंत आणून पुढे उत्तर तापी उगम कडे वळविणे शक्य असून, त्याचा परत उत्तर व दक्षिण कालवा तयार होतो व तो तापी विदर्भात येतो व मराठवाडा भागात उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रीय जल महामार्ग निर्माण होऊ शकतो, याचा लाभ महाराष्ट्र ,गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश मधील लाखो हेक्टर जमिनीवर पाणी प्रश्न मार्गी लागतो म्हणून या बाबत साहेबांनी नकाशा सह सर्व बघून व ऐकून माहिती जाणून घेतली. या विषयावर त्तातडीने राज्य रिपोर्ट वर काम करण्याचा विचार करू व सबंधित अधिकारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.
जलतज्ञ सदस्य नदीजोड प्रकल्प महाराष्ट्र राज्य रामचंद्र कमल कृष्णराव पिल्दे यांनी सांगितले की, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री राधाकृष्ण विखे पा. होते, ते जेव्हा सर्व स्टेज खाली उतरत आले आणि मी मुख्यमंत्री साहेब यांना आवाज दिला तेव्हा शेतकरी मित्र श्री धनुभाऊ धोरडे पाटील, यांनी मला बघितले व त्यांनी सहकार्य केले त्यांनी मला जलसंपदा मंत्री माननीय श्री गिरीश महाजन साहेब यांची भेट घालून दिली.
यात अंदाजे 15 मिनिटे साहेबांनी उभे राहून माझे सर्व म्हणणे ऐकून घेतले, या पूर्वी मी सन 2018 मधे साहेब जलसंपदा मंत्री असताना कोकणातील पाणी पूर्वेस वळविणे साठी प्रयत्न करत असताना महाराष्ट्र राज्याचा राज्यजल आराखडा मंजूर नव्हता तो मंत्रिमंडळात मंजूर करणे आवश्यक होते या कमी भेट घेतली होती, व त्या मुळेच कोकणातील पश्चिम वाहिनी पूर्वेस वळविले शक्य होणार होते आपण त्या वेळी तसे निवेदन दिले होते, या कामी आपली भेट झाली होती ती आठवण करून दिली,
त्या वेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सन 2019 च्या 6 व्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यजल आराखड्यास मान्यता दिली होती आठवण करून दिली, आणि त्याचे मराठी अनुवाद करण्यासाठी प्रयत्न केला तो पूर्ण झाला आहे त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही ते करावे म्हणून अजून ऐक निवेदन साहेबांनी स्वीकार केले,व लवकरच उद्घाटन करण्यात येईल असे मला सांगितले, या भेटी दरम्यान आजू बाजूचे उभे असलेले अनेक लोकांनी अभिनंदन करत मला नंतर विचारले मुख्यमंत्र्यांनी तुमचे कौतुक केले
खरतर घाई घाई मला ब्रह्मपुत्र नदीच्या पाण्याने उर्वरित मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विदर्भाचा लाभ करून घेणे गरजेचे आहे, व या करता राज्यात स्वतंत्र नदीजोड अधिकारी अभ्यास समिती गट गोदावरी व तापी खोरे स्थापन करण्याची गरज आहे व त्या मार्फत प्रत्येक राज्यात संपर्क करणे गरजेचे आहे, असे आपण निवेदनात सुचविले आहे,
त्यावेळी जे जे मला सुचले ते कमी वेळेत सांगायचे प्रयत्न केले साहेबांनी तो संपूर्ण 150 पानांचा रिपोर्ट व सविस्तर 2 निवेदन स्वीकार केले. या रिपोर्ट वर निश्चित लक्ष घालून जलशक्ती मंत्रालय nwda दिल्ली कडे उचित निर्देशन देऊन कार्यवाही करण्यासाठी सहकार्य केले जाईल असे मला या वेळी आश्वासनात साहेबांनी सांगितले,
तसेच मुख्यमंत्री साहेबांनी मला मुंबई मधे पुन्हा अवश्य भेटण्यास येण्याचे सागितले, या वेळी शेतकरी मित्र श्री. धनंजय धोर्डे, तसेच श्री.पंकज ठोंबरे, उपस्थित होते,
//00//
अधिक माहिती साठी संपर्क :
रामचंद्र कमल कृष्णराव पिल्दे,
(जलतज्ञ सदस्य नदीजोड प्रकल्प महाराष्ट्र राज्य),
8793988119,
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.