xtreme2day 11-08-2025 20:24:08 220456955
"आता पुन्हा हल्ला झाल्यास आम्ही अर्ध जगं नष्ट करु", पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांची अमेरिकेतुन दिली अण्वस्त्र हल्ल्याची धमकी अमेरिकेच्या जमिनीवरुन पाकिस्तानी सैन्य प्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी देण्याचा पहिलाचं प्रकार ! वॉशिंग्टन (एजन्सी वार्ता) - अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे सैन्य प्रमुख असीम मुनीर यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या. 'भारत कधी धरण बांधतोय त्याची आम्ही वाट पाहात आहोत. मग १० क्षेपणास्त्रं डागून ते उद्ध्वस्त करु. सिंधू नदी भारताची कौटुंबिक संपत्ती नाही आणि आमच्याकडे क्षेपणास्त्र हल्ल्यांची अजिबात कमतरता नाही, आता पुन्हा हल्ला झाल्यास "आम्ही अर्ध जगं नष्ट करु", पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी अमेरिकेतुन दिली आहे. अमेरिकेच्या जमिनीवरुन पाकिस्तानी सैन्य प्रमुखानं भारताला क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी देण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. भारताविरोधात अमेरिकेहून थेट भूमिका घेत असीम मुनीर धमक्या देत आहेत. यामागे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांची अमेरिकेत दुसरी भेट आहे. तसेच भारताला ही धमकी देताना मुनीर यांनी थेट प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नावाचा उल्लेख केला. देशातील सगळ्यात मोठे उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचा उल्लेख करुन मुनीर यांनी गरळ ओकली आहे. मुकेश अंबानी भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योगपती आणि आशियातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांचं नाव आणि फोटो दाखवून मुनीर यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानचं लक्ष्य केवळ सैनिकी तळ नसतील, तर भारताच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक असलेले दिग्गज उद्योगपतीही असतील, असं मुनीर यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं आहे.
wzeri5