xtreme2day 09-08-2025 21:54:48 89065501
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांना जगभरातून विरोध ; स्पेन व स्वित्झर्लंडने एफ-35 स्टिल्थ लढाऊ विमानांची खरेदी योजना केली रद्द वाशिंग्टन (एजन्सी वार्ता) - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला आता जगभरातून प्रत्युत्तर मिळू लागलं आहे. याचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेच्या एम-३५ स्टिल्थ फायटर जेटवर झाला आहे. अनेक देशांनी स्टिल्थ फायटर जेटपासून चार हात लांब राहण्यास सुरुवात केली आबे. युरोपातील लहानसा देश असलेल्या स्पेननं एफ-३५ स्टिल्थ लढाऊ विमानं खरेदीची योजना अधिकृतरित्या स्थगित केली आहे. याची माहिती स्पेन सरकारकडून देण्यात आलेली आहे. अमेरिकेकडून एफ-३५ स्टिल्थ विमानांची खरेदी करण्याऐवजी युरोफायटर टायफून आणि फ्यूचर कॉम्बॅट एअर सिस्टिम खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. स्पेन सरकार आता एअरबस, बीएई सिस्टम्स, लियोनार्डो, डसाल्ट एव्हिएशन आणि इंद्रा सिस्टेमास यांच्याकडून लक्ष देणार असल्यानं स्पेनच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. स्पेननं एफ-३५ लढाऊ विमानं खरेदी करण्याची योजना गुंडाळली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पॅनिश पंतप्रधान पेड्रो सांचेज यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यानंतर स्पेननं एफ-३५ स्टिल्थ लढाऊ विमानं खरेदीचा निर्णय रद्द केला. स्पेननं नाटोच्या बजेटमध्ये २ टक्क्यांची भागिदारी पूर्ण करावी आणि देशाचा संरक्षण खर्च जीडीपीच्या ५ टक्के करावा, असा आग्रह ट्रम्प यांनी धरला होता. ट्रम्प यांची मागणी स्पेननं धुडकावून लावली. त्यावरुन ट्रम्प भडकले आणि स्पॅनिश पंतप्रधानांबद्दल अद्वातद्वा बोलले. स्पॅनिश वस्तूंवर अधिक टॅरिफ लावण्याची धमकीही दिली. यामुळे संतापलेल्या स्पेननं एफ-३५ विमानांची खरेदी रद्द केली आहे. दरम्यान, स्वित्झर्लंडनंदेखील एफ-३५ स्टिल्थ लढाऊ विमानांच्या खरेदीपासून अंतर राखलं आहे. ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडवर ३९ टक्के टॅरिफ लावला आहे. त्यानंतर देशभरातून अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार रद्द करण्याची मागणी जोर धरु लागली. याबद्दल संसदेत मतदान घ्यावं अशी मागणी झाली. ग्रीन पक्षाचे बाल्थासार ग्लॅटली आणि सोशल डेमोक्रॅटचे नेते सॅड्रिक वेरमुथ यांनी एफ-३५ खरेदी करु नये, असं आवाहन केलं आहे. राष्ट्राध्यक्ष करिन केलर-सुटर यांच्या लिबरल पक्षातही या कराराविरोधात भूमिका घेतली जात आहे.
1y40ba