देशातील शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या हितासाठी संपूर्ण भारत तयार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला दिला स्पष्ट संकेत !
xtreme2day
07-08-2025 22:51:48
310785907
देशातील शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या हितासाठी संपूर्ण भारत तयार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला दिला स्पष्ट संकेत !
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादले आहे. यामुळे भारतीय वस्तूंवर असलेले एकूण शुल्क आता 50 टक्के इतके झाले आहे. या निर्णयानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भारताची ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी 'एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद'मध्ये बोलताना, शेतकरी आणि मच्छिमारांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे ठणकावून सांगितले.
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य अमेरिकेने भारतावर शुल्क वाढवल्यानंतर लगेचच आले आहे. यातून भारताने अमेरिकेला एक स्पष्ट संदेश दिला आहे की, भारताचे व्यापार धोरण हे देशाच्या राष्ट्रीय हितांवर, विशेषतः कृषी क्षेत्रावर आधारित असेल. पंतप्रधान मोदी म्हणाले, "शेतकऱ्यांचे हित हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही." या भूमिकेमुळे मला वैयक्तिकरित्या मोठी किंमत चुकवावी लागेल, याची मला जाणीव आहे, पण मी त्यासाठी तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. "आपल्या देशातील शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या हितासाठी संपूर्ण भारत तयार आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या अमेरिकेने वाढविलेल्या 50% (टॅक्समुळे) शुल्कामुळे भारताच्या निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसणार असल्याचे उद्योग तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशेषतः वस्त्रोद्योग, चामडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो पार्ट्स यांसारख्या उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या शुल्कामुळे भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारात 50 टक्के अधिक महाग होतील, ज्यामुळे निर्यात सुमारे 40 टक्के ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतावरील वाढलेल्या शुल्कामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका ऑटो पार्ट्स, टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांना बसू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा आर्थिक धक्का दिला आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारतावर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या निर्णयामुळे आता भारतीय वस्तूंवर असलेले एकूण शुल्क 50 टक्के इतके झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी यासंदर्भात एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यांच्या या आदेशामुळे आधी लागू होणाऱ्या शुल्काव्यतिरिक्त हे अतिरिक्त शुल्क लावण्यात आले आहे. आधीचे 25 टक्के शुल्क 7 ऑगस्ट पासून लागू झाले आहे, तर हे नवीन 25 टक्के अतिरिक्त शुल्क 21 दिवसांनंतर लागू होईल. याचा अर्थ, 27 ऑगस्ट पासून भारताची आयात 50 टक्के अधिक महाग होणार आहे. ट्रम्प यांनी भारताच्या या निर्णयाला 'रशियाच्या युद्ध यंत्रणेला इंधन पुरवण्यासारखे' असल्याचे म्हटले आहे, आणि यावर ते खूश नसल्याचेही स्पष्ट केले आहे. अतिरिक्त शुल्कामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार असंतुलन आणखी वाढू शकते. अनेक कंपन्या त्यांच्या सप्लाय चेनवर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेच्या बाजारात 50 टक्के इतके सर्वाधिक शुल्क भारत आणि ब्राझीलवर लागू करण्यात आले आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताची निर्यातीच्या बाबतीत मागे पडू शकतो. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि अयोग्य आहे. भारताच्या अमेरिकेतील निर्यातीवर 50% पर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादला आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत असून या दरम्यान मार्केटच्या गुंतवणूकदारांना तब्बल 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.