राज्यातील पत्रकार, संपादकांनी माऊंट अबु येथील विशेष राष्ट्रीय पत्रकार संमेलनात सामिल व्हावे -ज्येष्ठ पत्रकार डॉ.जयपाल पाटील
xtreme2day
24-07-2025 17:50:36
5670873
राज्यातील पत्रकार, संपादकांनी माऊंट अबु येथील विशेष राष्ट्रीय पत्रकार संमेलनात सामिल व्हावे -ज्येष्ठ पत्रकार डॉ.जयपाल पाटील
अलिबाग -प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या राजयोग शिक्षण आणी संशोधन पत्रकार विभाग तर्फे दिनांक 26 ते 30 सप्टेंबरला ब्रम्हाकुमारी मुख्यालय शांतीवन अबुरोड राजस्थानला आयोजित केलेल्या राष्ट्रीय संमेलनात संपादक, पत्रकार, यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी केले आहे.
समाजातील पत्रकाराचे विशेष महत्त्व असुन समाजामधे, शांतता, एकता आणि विश्वास वाढविण्याचे कार्य ते करतात असे मत मुख्य ब्रम्हाकुमारी राज योगिनी बी के मोहीनीचे असुन संस्थापक प्रजापिता ब्रम्हांबाबा यांचे आदेशानुसार राष्ट्रीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. येथे देश-विदेशातील पत्रकार तज्ञाचे, प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन होणार,आपण अबुरोड ला पोहचतात. "त्यांचे स्वागत केले जाते आणि मांउट अबुला नेण्यास मोफत बसने नेण्यात येणार तेथे आपली नोंदणी केल्यावर पुरुष व महिला वेग वेगळी रहाण्याची मोफत व्यवस्था असते. त्याच बरोबर चहा,कॉफी, दुध,शुद्ध शाकाहारी भोजन मोफत समाविष्ट असते.दररोज वेगळे अभ्यास पुर्ण मार्गदर्शन व एक दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, एक दिवस मांउट अबुशहर दर्शन केले जाते. आपण पत्रकार म्हणजेच सामाजिक कार्यकर्ता येथील शिवबाबांनी जर्मन ईजिनियरींगच्या सेवकांनी बसविलेले सोलर प्रकल्प, येथील गोरगरीबांचे मोफत व सोबतीची व्यवस्था ह्रदयशत्रक्रिया करणारे रुग्णालयात अवश्य भेट देऊन आपल्या दैनिकात, साप्ताहिकात, मासिकात लेख अवश्य लिहा.
या संमेलनात सहभागी होण्यास नोंदणी साठी, राजयोगी बी के करूणा,अध्यक्ष पत्रकार विभाग यांनी सांगितले की, आपले पुर्ण नांव व पत्ता, अधिक कृत, पत्रकार ओळखपत्राची पुढील व मागील बाजू ,मोबाईल क्रमांक, ईमेल,शिक्षण,कोणत्या पत्रकार संघटनेतून येताय त्यांचे पत्र सोबत ठेवून मुख्य कार्यालय मो.9414156615 / 94133 23922/9010161616 अथवा व्हाट्सअप क्रमांक 7023706615 तसेच आपला लेटरहेड वरुन ईमेल [email protected] येथे पाठवुन मंजूरी आली की जाणे, येणे आपण रेल्वे बुकिंग करावी, काही अडचण आल्यास जनसंपर्क अधिकारी बी के शांतनु भाई 9414156615 यांना संपर्क करावा. त्यानंतर आपल्या शहरातील प्रजापिता केंद्र प्रमुख दिदींना भेटावे असे आवाहन प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.