प्रा.जीवन मुळे व डॉ प्रीतम सेलमोकर लिखित“लाईफ स्किल्स (जीवन कौशल्ये) २.० -भाग पहिला” पुस्तकाचे प्रकाशन
xtreme2day
22-07-2025 17:37:46
1327458
प्रा.जीवन मुळे व डॉ प्रीतम सेलमोकर लिखित“लाईफ स्किल्स (जीवन कौशल्ये) २.० -भाग पहिला” पुस्तकाचे प्रकाशन
पुणे (प्रतिनिधी) - सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ येथे “लाईफ स्किल्स (जीवन कौशल्ये) 2.0 – भाग पहिला” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक प्रा. जीवन मुळे (माजी प्राचार्य, पॉलिटेक्निक कॉलेज)आणि डॉ. सौ.प्रीतम हेमंत सेलमोकर सहाय्यक प्राध्यापक,मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग,सीओईपी टेक यांनी संयुक्तपणे लिहिले आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन प्रा.डॉ नितीन करमळकर,माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाले.या प्रसंगी प्रा.डॉ सुनील भिरुड, कुलगुरू सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ,डॉ. डी. एन.सोनवणे,कुलसचिव, प्रा.पराग सदगीर,अधिष्ठाता,स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी,डॉ चेतन पाटील,अधिष्ठाता डॉ. प्रशांत बारटक्के,सहयोगी अधिष्ठाता,डॉ प्रदीप देशमुख विभाग प्रमुख संगणक शास्त्र यांची मुख्य उपस्थिती होती.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला,(NEP -२०२०) अनुसरून विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC ) पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी लाईफ स्किल्स-२.० हा विषय विशेषत्वाने निर्धारित केला आहे.हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा उद्देश तरुण पिढीचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास व्हावा व विद्यार्थी रोजगाराभिमुख व कौशल्याधिष्ठित घडेल तसेच आजची तरुणाई सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक व्हावी हा ह्या पुस्तक लिहिण्याचा उद्देश आहे. हे पुस्तक निर्धारित अभ्यासक्रमाशी निगडित असल्यामुळे पदवीपूर्व शिक्षण घेणारे विद्यार्थी,प्राध्यापक, शैक्षणिक संस्था यासाठी विशेष उपयुक्त आहे.प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन यशस्वी समृद्ध जगण्यासाठी जीवन कौशल्यांची नितांत आवश्यकता असते.हे पुस्तक वाचून त्यांची गरज निश्चितपणे मार्गी लागू शकते. या पुस्तकाची चार भागात विभागणी करण्यात आली असून,संवाद कौशल्य,नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य,व्यावसायिक कौशल्य आणि वैश्विक मानवी मूल्ये याअंतर्गत १८ कौशल्ये सुस्पष्टपणे समजावून दिली आहेत.प्राचार्य जीवन मुळे आणि डॉ प्रीतम सेलमोकर यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव या पुस्तकात प्रतिबिंबित झालेला आहे.
प्रा जीवन मुळे हे सिव्हिल इंजिनियर इंजिनियर असून शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अधिव्याख्याता ते प्राचार्य अशी ३५ वर्षे सेवा केली.त्यांची सिव्हिल इंजिनियरिंग मधील आठ पुस्तके तसेच उद्योजक्त,व्यवस्थापन, करियर या विषयावर दहा पुस्तके प्रकाशित झाले आहेत.तसेच दोनशे च्या वर लेख विविध दैनिक,दिवाळी अंक मध्ये लेख प्रकाशित झाले आहे.महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार,मराठवाडा भूषण पुरस्कार,बेस्ट पॉलिटेक्निक टीचर ऑफ महाराष्ट्र पुरस्कार,ज्ञानरत्न पुरस्कार इ पुरस्काराने प्रा जीवन मुळे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.