Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १५ जुलै ऐवजी १३ जुलै रोजी आयोजन

xtreme2day   09-07-2025 20:46:10   5689467

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १५ जुलै ऐवजी १३ जुलै रोजी आयोजन

 

पुणे, (प्रतिनिधी) -  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे पोलीस आयुक्तालय आणि हरीभाई व्ही देसाई कॉलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता हरीभाई व्ही देसाई कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ५९६, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, बुधवार पेठ, पुणे येथे ‘पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

 

काही अपरिहार्य प्रशासकीय कारणामुळे मंगळवार, १५ जुलै २०२५ रोजी होणारा रोजगार मेळावा हा आता रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये यांनी केले आहे.

 

या मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध उद्योजकांनी २ हजारपेक्षा जास्त रिक्तपदे कळविली आहेत. त्यांच्याकडून ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

 

इच्छुकांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांना अर्ज करावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे-४११००१ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती