xtreme2day 07-07-2025 20:29:44 2209971
छत्रपती संभाजीनगरचा डंका, सीए अंतिम परीक्षेत राजन काबरा देशातून पहिला; जिल्ह्यातील 7 विद्यार्थी रँकमध्ये छत्रपती संभाजी नगर (विशेष प्रतिनिधी) - .द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या वतीने मे महिन्यात सनदी लेखापाल म्हणजेच सीएची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशातून पहिला आला असून छत्रपती संभाजीनगरचे तब्बल सात विद्यार्थी रँकमध्ये आले आहे. राजन काबरा चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या जगातील नवा स्टार ठरला आहे. अवघ्या 22 व्या वर्षी त्याने सीएच्या तिन्ही परीक्षा फाऊंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम परीक्षा केवळ पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. राजन हा स्वत: सीए कुटुंबातील आहे. त्याचे वडील स्चार्टर्ड अकाऊंटंट आहे. आई गृहिणी तर बहीण डॉक्टर आहे. राजनने या काळात ICAI च्या स्टडी मटेरियलवर लक्ष केंद्रीत केलं. त्याने सांगितलं की, माझ्या यशाचं कोणतंही सिक्रेट नाही. मी केवळ ICAI च्या सामग्रीवर फोकस केला. कॉन्सप्ट क्लियर ठेवले आणि वारंवार सराव केला. विषय समजून घेण्यासाठी त्याने कोचिंग लावली होती. अकोल्याच्या शेतकरी पुत्राची मोठी भरारी, बीसीसीआयच्या पंच परीक्षेत भारतातून आला पहिला अकोल्याच्या सांगवी खुर्द गावांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलाने जून महिन्यात अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियम येथे देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामंक मंडळ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत पंच पॅनलमध्ये देशातून पहिला येण्याचा बहुमान मिळवलाय. एकंदरीत हलाखीच्या परिस्थितीत ग्रामीण भागातून मराठी शाळेत शिक्षण घेतलं असतानाही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्यांनी गावासह देशभरात जिल्ह्याचे बहुमान पटकवत क्रिकेटमध्ये नाव कोरलं आहे.