"एलोनचं ऐका… तो मूर्ख नाहीये" ; एलोन मस्कचे वडील एरोल मस्क यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन
xtreme2day
04-07-2025 16:24:44
12125573
"एलोनचं ऐका… तो मूर्ख नाहीये" ; एलोन मस्कचे वडील एरोल मस्क यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन
वाशिंग्टन - मोठे मस्क (एरोल मस्क) यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना “एलोनचं ऐका” अशी विनंती केली आणि असंही म्हटलं की “तो मूर्ख नाही.” शेवटी, मस्क यांचे वडील ट्रम्प आणि एलोन या दोघांनी “एकत्र बसून बोलून घ्या” असा सल्ला दिला आहे.
ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला, जेव्हा टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अब्जाधीश एलोन मस्क यांनी ट्रम्प यांच्या नव्या संघीय खर्च विधेयकावर टीका केली. हा वाद इतका वाढला की मस्क यांनी धमकी दिली की, जर हे विधेयक सिनेटने मंजूर केले, तर ते “अमेरिका पार्टी” नावाचा नवा राजकीय गट स्थापन करतील.
दरम्यान, एका अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या वन बिग ब्युटिफुल बिल बाबत एरोल आणि एलोन यांचे मत वेगवेगळे आहे. टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अब्जाधीश एलोन मस्क यांनी या विधेयकावर सातत्याने टीका केली आहे, तर दुसरीकडे एरोल मस्क या विधेयकाचे समर्थन करतात. या बिलाबद्दल बोलताना एरोल म्हणाले, “अमेरिकेचं पुन्हा बांधकाम करणं खूप गरजेचं आहे... त्यांना पैसा खर्च करण्याची गरज आहे.”
तसेच, एरोल मस्क यांनी आपल्या मुलाला, एलोन मस्क याला “गप्प बस” आणि विशेषतः टेस्ला या व्यवसायावर लक्ष केंद्रित कर, असा सल्ला दिला. त्यांनी मान्य केले की राजकारण अतिशय गुंतागुंतीचं असतं, “भावना चिघळतात” आणि “मानवी वर्तन खूप गुंतागुंतीचं असतं”, त्यामुळे एलोनने आपलं लक्ष ज्या गोष्टीत तो उत्तम आहे — म्हणजेच आपली कंपनी चालवण्यात — केंद्रित करावं, असं त्यांनी सुचवलं.
एरोल मस्क यांनी एलोन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादाबाबत आश्चर्य व्यक्त केलं. ते म्हणाले:“ट्रम्प हे एलोनविरुद्ध का गेले, हे मला खरंच समजत नाही. यामागचं काहीच अर्थ लागत नाही.”
ट्रम्प यांनी मस्कच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केला आणि इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीच्या बंधनकारक नियमांवर टीका केली, त्यांना त्यांनी “मूर्खपणाचे” असे संबोधले.
“एलोन मस्कला माहिती होतं, अगदी त्याने मला राष्ट्राध्यक्षपदासाठी उघडपणे पाठिंबा देण्याच्या आधीपासूनच, की मी EV (इलेक्ट्रिक वाहन) मॅंडेटला जोरदार विरोध करत होतो. हे मॅंडेट मूर्खपणाचं आहे आणि माझ्या प्रचाराचा तो मोठा भाग राहिला आहे. इलेक्ट्रिक गाड्या ठीक आहेत, पण सगळ्यांवर ती सक्ती करून लादणं योग्य नाही,” असं ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.