आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले पहिले भारतीय शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद
xtreme2day
29-06-2025 15:16:45
136785651
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले पहिले भारतीय शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेलेले पहिले भारतीय शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संवाद साधला. पंतप्रधानांनी 'नमस्कार'ने संवादाची सुरुवात करत म्हणाले की, "आज तुम्ही भारतापासून दूर आहात, पण भारताच्या आकांक्षा तुमच्या सोबत आहेत. तुमच्या नावातही 'शुभ' आहे, तुमची ही यात्रा नव्या युगाची सुरुवात आहे. आपण दोघे बोलत असलो तरी, माझ्या आवाजातून 140 कोटी भारतीयांचा उत्साह व्यक्त होत आहे. अंतराळात भारताचा झेंडा फडकवल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा."
पंतप्रधानांनी शुभांशू शुक्ला यांना विचारले की, "तिथे सर्व कुशल-मंगल आहे ना, तुमची तब्येत ठीक आहे ना?" यावर शुक्ला म्हणाले की, "भारतीयांच्या सदिच्छांमुळे मी इथे ठीक आहे. मी लहान असताना कधी विचारही केला नव्हता की मी कधी अंतराळात पोहोचेल. आज तुमच्या (पंतप्रधानांच्या) नेतृत्वाखालील आजचा भारत स्वप्नांना साकार करण्याची संधी देतो. याचंच हे परिणाम आहे की, मी देशाचं प्रतिनिधित्व करू शकलो." पंतप्रधानांनी शुभांशू यांना विचारले की, "तुम्ही सोबत घेऊन गेलेला गाजर हलवा, मूग डाळ हलवा, आमरस तुमच्या सहकाऱ्यांना खायला दिला की नाही?" यावर शुभांशू म्हणाले की, "हो, आम्ही सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला." शुभांशू शुक्ला यांनी सांगितले की, "अंतराळातून पाहिल्यावर भारत खूप भव्य दिसतो, नकाशात दिसतो त्याहूनही जास्त भव्य दिसतो."
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझी सवय आहे की मी जेव्हा कोणाला भेटतो, तेव्हा गृहपाठ (होमवर्क) देतो." पंतप्रधानांनी शुभांशू यांना सांगितले की, "तुमचा गृहपाठ हा आहे की, तुम्हाला जो अनुभव मिळत आहे, त्याचा उपयोग आपल्याला गगनयानला पुढे नेण्यासाठी आणि चंद्रावर लँडिंग करण्यासाठी करायचा आहे." यावर शुभांशू म्हणाले की, "मला इथे जे अनुभव मिळत आहेत, ते खूप मौल्यवान आहेत. मी जेव्हा परत येईन, तेव्हा निश्चितच गगनयानसह इतर मोहिमांना पुढे नेण्यासाठी काम करेन." शुभांशू यांनी सांगितले की, गगनयानबद्दल अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांमध्येही उत्साह आहे. "जेव्हा त्यांनी मला विचारलं की, आम्ही गगनयानवर कधी जाऊ शकतो, तेव्हा मला आनंद झाला," असंही ते म्हणाले. "तुमचा गृहपाठ हा आहे की, तुम्हाला जो अनुभव मिळत आहे, त्याचा उपयोग आपल्याला गगनयानला पुढे नेण्यासाठी आणि चंद्रावर लँडिंग करण्यासाठी करायचा आहे." यावर शुभांशू म्हणाले की, "मला इथे जे अनुभव मिळत आहेत, ते खूप मौल्यवान आहेत. मी जेव्हा परत येईन, तेव्हा निश्चितच गगनयानसह इतर मोहिमांना पुढे नेण्यासाठी काम करेन." शुभांशू यांनी सांगितले की, गगनयानबद्दल अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांमध्येही उत्साह आहे. "जेव्हा त्यांनी मला विचारलं की, आम्ही गगनयानवर कधी जाऊ शकतो, तेव्हा मला आनंद झाला," असंही ते म्हणाले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.