xtreme2day 28-06-2025 13:02:48 6978692
पेण रेल्वे स्थानकात लांब पल्याच्या गाड्या थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार- खासदार सुनील तटकरे रायगड (विशेष प्रतिनिधी ) - कोकणात पेण व अलिबाग तालुक्यातील रेल्वे प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी पनवेल आणि रोहा येथे जावे लागते यासाठी जास्त त्रास आणि खर्च अलिबागच्या रेल्वे प्रवासासाठी जाणाऱ्यांना आजपर्यंत होत आहे. तसेच पेण रेल्वे प्रवासी संघटना प्रयत्नशील आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन दिले होते. या कामी प्राध्यापक शाम जोगळेकर यांचा सतत पाठपुरावा होता. काही दिवसांपूर्वी रोहा रेल्वे स्टेशनला दक्षिण भारतात व गोव्याला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या खासदार श्री. सुनील तटकरे यांनी विशेष प्रयत्न करून थांबविल्या. आणि तेथील रेल्वे प्रवाशाला आनंद झाला. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालया मध्ये पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकार डॉ. जयपाल पाटील यांनी पेण आणि अलिबाग करांना पेण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्या काही थांबविल्या पाहिजेत अशी मागणी केली. त्यावेळी खासदार श्री. सुनील तटकरे म्हणाले रोहास तालुका सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या पाणी भरून घेणे आणि तपासणीचा टेक्निकल थांबा होता तो मी कमर्शियल करून जनतेची व्यवस्था केली. यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. जयपाल पाटील म्हणाले की अलिबाग तालुक्यात राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर, गेल इंडिया लिमिटेड, इस्पात लिमिटेड तसेच पेण तालुक्यात विविध कामगार क्षेत्रातील कर्मचारी राहतात व सोबत सरकारी कर्मचारी ही दोन्ही तालुक्यात कोकणातील वास्तव्यात आहेत. यासाठी पेण रेल्वे स्थानकात काही दक्षिण भारतात ला जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबल्या पाहिजेत. तर खासदार श्री. सुनील तटकरे म्हणाले की पुढील आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्यासोबत बैठक असून त्यावेळी पेण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेन असे सांगितले. हे काम लवकरात लवकर करावे अशी विनंती खासदारांना डॉ. जयपाल पाटील यांनी यावेळी केली. ज्यामुळे अलिबाग व पेण तालुक्यातील कोकण आणि दक्षिण भारतात ला जाणाऱ्या प्रवाशांचा निश्चितच खर्च आणि वेळ वाचेल कारण दक्षिण भारताच्याच्या गाड्या रात्री पनवेल ला येतात, तेथून अलिबागला यायला एसटीची बस व्यवस्था नसते, खाजगी वाहने करूनच रात्री यावे लागते त्यामुळे खर्चही वाढतो.