नवउद्योजकांना स्टॅन्डअप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
xtreme2day
26-06-2025 17:51:48
5584390
नवउद्योजकांना स्टॅन्डअप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे (प्रतिनिधी) - केंद्र शासनाच्या स्टॅन्डअप योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा २५टक्के रक्कमेपैकी अधिकाधिक १५ टक्के मार्जिन मनी वितरित करण्याची योजना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येते.तरी नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलतीस पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड अप योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ अनुदान राज्यशासनामार्फत देण्यात येते.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय जिल्हा पुणे, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर, येरवडा, पुणे ४११००६ दूरध्वनी - ०२०-२९७०६६११ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पुणे यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.