Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

भारताच्या ह्युमन स्पेस प्रोगाम मोहिमेसाठी अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर कित्येक वर्षांनी भारतीय वंशाचे शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावले !

xtreme2day   25-06-2025 17:57:34   98023948

भारताच्या ह्युमन स्पेस प्रोगाम मोहिमेसाठी अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर कित्येक वर्षांनी भारतीय वंशाचे शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावले ! 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर कित्येक वर्षांनी भारतीय वंशाचे शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावले आहेत. अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर कित्येक वर्षांनी भारतीय वंशाचे शुभांशू शुक्ला अंतराळात झेपावले आहेत. अनेकदा रद्द झाल्यानंतर अखेर मिशन Axiom-4 अंतराळात (Mission Axiom-4) झेपावलं आहे. 

अंतराळात झेपावताच शुभांशू शुक्ला याने भारतीयांना संदेश दिला आहे. शुभांशू अंतराळात झेपावताना संपूर्ण भारतीयांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळत होते. त्यांची आईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. 

भारताच्या भविष्यातील विकासासाठी ही मोहिम अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या मोहिमेच्या निमित्ताने भारताच्या ह्युमन स्पेस प्रोगामची सुरुवात होणार आहे. त्यामुळे अंतराळात झेपावताच शुंभाशूने भारतीयांसाठी एक खास संदेश दिला आहे. 

 

शुभान्शु शुक्ला मेसेजद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात की, माझ्या प्रिय भारतीयांनो...जय हिंद...41 वर्षांनंतर आपण पुन्हा अंतराळात पोहोचलो आहे. कमालीची राइड होती.  सध्या आम्ही साडे सात किलोमीटर प्रतिसेकंदाच्या वेगाने पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे. जो मला सांगतोय की या प्रवासात मी एकटा नाहीये. तुम्ही माझ्यासोबत आहात. ही केवळ माझी एकट्याची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठीच्या प्रवासाची सुरुवात नाही तर भारताची ह्युम स्पेस प्रोग्रामची सुरुवात आहे. माझी इच्छा आहे, सर्व भारतीयांनी या मोहिमेचा भाग व्हावे, तुम्हालाही तितकाच अभिमान वाटायला हवा. तुम्हीली यात उत्सुकता दाखवा. आपण सर्वजण मिळून भारताच्या ह्युमन स्पेस प्रोग्रामची सुरुवात करूया.  धन्यवाद, जयहिंद जयभारत!

 

Axiom-4 मिशन भारतासाठी गर्वाचा क्षण आहे. यामुळे देशाला अनेक फायदे मिळू शकतात. या मिशनमुळे भारताला अंतराळ संशोधनात आपली क्षमता वाढवण्याची आणि जागतिक स्तरावर आपली उपस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल. हे मिशन भारत, हंगेरी आणि पोलंड या तीन देशांसाठी ऐतिहासिक मानली जात आहे. विशेषत: भारतासाठी ही संधी अत्यंत खास आहे. कारण बऱ्याच अवधीनंतर एक भारतीय अंतराळात प्रस्थान करणार आहे. या मिशनमध्ये भारतीय वंशाचे इस्त्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) च्या दिशेने रवाना होतील. हा भारतासाठी दगडाचा मैल असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Axiom-4 मिशन भारतासाठी गर्वाचा क्षण आहे. यामुळे देशाला अनेक फायदे मिळू शकतात. या मिशनमुळे  भारताला अंतराळ संशोधनात आपली क्षमता वाढवण्याची आणि जागतिक स्तरावर आपली उपस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल. अ‍ॅक्सिओम-4 मोहीम केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर ती भारताची जागतिक प्रतिष्ठा, तांत्रिक क्षमता आणि आर्थिक शक्यतांना नवीन उंचीवर नेण्यासही तयार होईल. या मोहिमेत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. 1984 नंतर पहिल्यांदा कोणी भारतीय अंतराळवीर या मिशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनचा भाग होणार आहे. Axiom-4 मिशन दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत. यात 31 देशांमधील वैज्ञानिक आणि संस्थांचा समावेश आहे. भारत आणि NASA च्या संयुक्त सहयोगामुळे 12 प्रयोग होतील. यामध्ये 7 भारतीय आणि 5 अमेरिकन संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रयोग प्रामुख्याने जैविक विज्ञान, मानवी आरोग्य, अवकाश जीवन प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतील.

 

दरम्यान, Axiom Space मध्ये वेबसाइटनुसार, चारही अंतराळ प्रवासी आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनवर 14 दिवसांपर्यंत 60 प्रयोग करतील. शुभांशु शक्ला अंतराळात सात प्रयोग करतील. ज्याचा उद्देश भारतात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधनाला प्रोत्साहन देणे आहे. भारताचे 2035 पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक बांधण्याचे आणि 2047 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. भारत त्यासाठी तयारी करत आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती