श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुण्याच्या रेल्वे स्थानकाला द्या - खासदार मेघा कुलकर्णी
xtreme2day
24-06-2025 17:31:38
463300073
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुण्याच्या रेल्वे स्थानकाला द्या - खासदार मेघा कुलकर्णी

पुणे (विशेष प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा थोरले बाजीराव पेशवे यांनी केला आहे आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अटक ते कटक इथपर्यंत साम्राज्य नेलं. याचं प्रतिक हे शनिवारवाडा आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार मेघा कुलकर्णी यांनी केली आहे.

पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या या मागणमुळे आता पुण्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाची डागडुजी करणे फार महत्त्वाचं आहे. पुणे स्थानकाच्या आवारात या शहराच्या इतिहासाचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही. या स्थानकाची डागडुजी करत असताना हा इतिहास प्रतिबिंबित झाला पाहिजे. सगळ्या देशातील वेगवेगेळी रेल्वे स्थानकं, विमानतळं या ठिकाणी आपल्या भारत देशाचा इतिहास दिसायला हवा. हीच मागणी मी केली आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुण्याच्या रेल्वे स्थानकाला द्यायला हवं, अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली.
याबाबत अधिक माहिती देताना खासदार मेघा कुलकर्णी यांनी सांगितले की , मध्य रेल्वे विभागीय समितीच्या पुणे व सोलापूर मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहून मी रेल्वे स्थानक आधुनिकीकरणासह नवीन रेल्वे गाड्या व रेल्वेशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण मागण्या या बैठकीत मांडल्या.
हैदराबाद - दिल्ली किंवा बंगळुरू - दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला पुण्यात थांबा द्यावा, पुण्याचा समृद्ध इतिहास पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रतिबिंबित होईल या दृष्टीने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करावे, नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पुणे - नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्या, भारत गौरव अंतर्गत पुणे - अयोध्या रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी, सिंहगड एक्स्प्रेसला बदलापूर येथे थांबा देण्यात यावा, बदलापूर - पुणे वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात यावी, पुणे - हरंगुल एक्सप्रेसचे उदगीर किंवा बीदर पर्यंत विस्तारीकरण करण्यात यावे, जळगाव रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा, सोलापूर - मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) एक्सप्रेस गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या व गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा तसेच पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे या मागण्या त्यांनी केल्या आहेत.
या बैठकीला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. धर्मवीर मीना व विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. राजेश कुमार वर्मा यांच्यासह खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे, खासदार सौ. सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे व पुणे आणि सोलापूर विभागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.