Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित 'संवाद वारी' प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

xtreme2day   21-06-2025 18:47:00   3489588

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित 'संवाद वारी' प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, (विशेष प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ठळक लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती देणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत आयोजित 'संवाद वारी'या चित्र प्रदर्शनाचे, एलइडी व्हॅन कलापथक व्हॅन तसेच चित्ररथाचे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आदी उपस्थित होते.

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हे प्रदर्शन ठेवण्यात येणार असून मुक्काम तळांसोबत संपूर्ण मार्गावर चित्ररथ, कलापथक तसेच एलइडी व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती करणार आहेत. 

 

प्रदर्शनात ३० फ्लेक्स पॅनेलचा समावेश आहे. पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्डची सुविधा पशुपालकांना देणे, पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकासाला चालना, बळीराजा शेतकऱ्याच्या उन्नतीसाठीच्या योजना व घेतलेले निर्णय, नागरिकांना भेसळविरहित अन्नधान्य मिळावे यासाठी सुरक्षित अन्न तपासणीच्या सुविधा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, 'महाविस्तार- एआय' ॲप, सायबर सुरक्षितता, जलसिंचनासाठीचे प्रकल्प, सामाजिक न्यायासाठी मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापना, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना, आदिवासींच्या उत्थानासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत ३० लाख घरे मंजूर, पीएम- जनमन, रमाई, शबरी, अटल बांधकाम कामगार वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मोदी आवास योजना आदी योजनांची  माहिती देण्यात आली आहे. 

 

याशिवाय पशुसंवर्धन अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना, राज्य स्तरावर कॉल सेंटरची स्थापना, पशु आरोग्य सेवांसाठी टोल फ्री क्रमांक, सहकार विभागांतर्गत आपले सहकार पोर्टलवर सहकार विभागाच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध, परिवहन विभागांतर्गत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, गोवारी बांधवांच्या विकासासाठी स्वतंत्र योजना, दिव्यांगणसाठी स्वतंत्र विभाग, उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी आदी माहिती या प्रदर्शनात फ्लेक्स पॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती