Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

इस्राएलमधील सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करण्यासाठी इराण करणार अत्यंत घातक अशा क्लस्टर बाँबचा वापर !

xtreme2day   21-06-2025 18:41:51   11227795

इस्राएलमधील सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करण्यासाठी इराण करणार अत्यंत घातक अशा क्लस्टर बाँबचा वापर !

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - इराण इस्रायलवर एकापाठोपाठ घातक हल्ले करत आहे. हॉस्पिटल, शेअर मार्केट आणि अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसवर बॉम्बहल्ले सुरू झाले आहेत.  सैन्याविरोधात युद्ध न लढता आता इराणनं इस्रायलच्या जनतेवरच वार सुरू केले आहेत. आणि त्यासाठी इराणनं त्याच्या भात्यातलं सर्वात खतरनाक अस्त्रं बाहेर काढलं आहे. या अस्त्राचं नाव क्लस्टर बॉम्ब! 

 

आंतरराष्ट्रीय वृत्तसेवा रायटरने दिलेल्या माहितीनुसार, अख्ख्या जगाला ज्याची भीती वाटते तोच हा क्लस्टर बॉम्ब आहे. जगभरात या बॉम्बची एवढी दहशत आहे, की हा क्लस्टर बॉम्ब सहसा वापरलाच जाता नाही. क्लस्टर बॉम्ब म्हणजे एकाच बॉम्बमध्ये शेकडो बॉम्ब बसवलेले असतात. हा बॉम्ब हवेत असतानाच रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कमांड दिली जाते. या बॉम्बमधून एकाच वेळी शेकडो बॉम्ब बाहेर येतात आणि शहरावर या बॉम्बचा वर्षाव होतो. थोडक्यात आपण दिवाळीत आकाशात जसे शोभेचे फटाते फुटताना पाहतो, तसेच आकाशातून हे बॉम्ब फुटतात. त्यानंतर ते जमिनीवर प्रचंड विनाश करतात.

 

एखादं मिसाईल हे एखाद्या ठरवलेल्या टार्गेटवर निशाणा साधतं. मात्र या क्लस्टर बॉम्बची व्याप्ती मोठी असते. हे क्लस्टर बॉम्ब एकाच वेळी जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडतात. म्हणजेच एकाच ठिकाणी बॉम्ब फुटून नुकसान होण्या ऐवजी वेगवेगळ्या ठिकाणांवर बॉम्ब पडून नुकसान केलं जातं. ज्यावेळी सर्वसामान्य जनतेला टार्गेट करायचं असतं, अशा वेळी या क्लस्टर बॉम्बचा वापर केला जातो. इस्रायलच्या सोरोका मेडिकल सेंटरवर हाच क्लस्टरबॉम्ब टाकल्याचा दावा केला जात आहे. इराणनं इस्रायलमध्ये टाकलेला हा क्लस्टर बॉम्ब जमिनीपासून सात किलोमीटर उंचीवर फुटला.

 

 क्लस्टर बॉम्ब आणि त्याच्यामधल्या शेकडो बॉम्बसनी जमिनीवर जवळपास आठ किलोमीटरवर नुकसान केलं. आणखी महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा फटाके फुटतो, त्यावेळी एखादा फटाका फुसका निघतो आणि तो फुटत नाही. त्याप्रमाणेच हे जे शेकडो बॉम्ब जमिनीवर हल्ला करतात, त्यावेळी यातले काही बॉम्ब फुटत नाहीत. मात्र जमिनीवर पडल्यानंतर या बॉम्बसना कुणाचा धक्का लागला तर ते लगेचच फुटतात. त्यामुळेच जमिनीवरच्या कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नका, अशा सूचना इस्रायल नागरिकांना देण्यात आल्या आहेत. युद्ध हे खरं तर दोन देशाच्या सैन्यांमध्ये लढलं जातं. मात्र या क्लस्टर बॉम्बचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करण्यासाठी केला जातो. म्हणूनच या क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी आहे. 2008 मध्ये क्लस्टरबॉम्बच्या उपयोगाविरोधात एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. या करारानुसार या बॉम्बचा उपयोग, हस्तांतरण आणि निर्मितीवर बंदी घालण्यात आली. क्लस्टर बॉम्बचा उपयोग करणार नाही, या करारावर 111 देशांनी सह्या केल्या आहेत. मात्र इरान, इस्रायल आणि अमेरिकेनं स्वतःच्या सुरक्षेचं कारण देत या करारावर सही करायला नकार दिला आहे.  त्यानंतर 2023 मध्ये रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेनं युक्रेनला क्लस्टर बॉम्ब दिल्याचं बोललं जातं आहे. 

 

भारत,चीन आणि पाकिस्ताननंही क्लस्टरबॉम्ब वापरणार नाही, या करारावर सही केलेली नाही. आतापर्यंत तरी भारतानं या क्लस्टरबॉम्बचा वापर कधीही केलेला नाही. मात्र गरज पडली तर भारतही या क्लस्टरबॉम्बचा वापर करु शकतो. क्लस्टरबॉम्बचा वापर पहिल्यांदा दुसऱ्या महायुद्धात करण्यात आला होता. सध्या अमेरिका,रशिया आणि इटलीकडे या क्लस्टरबॉम्बचं तंत्रज्ञान आहे. जेव्हा युद्धात नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या क्लस्टरबॉम्ब वापरायची वेळ येते, तेव्हा ती आर-पारची लढाई समजली जाते. त्यामुळे इराण-इस्रायल युद्ध आणखी स्फोटक होणार आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती