Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

xtreme2day   21-05-2025 17:27:08   19879993

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

पुणे, (विशेष प्रतिनिधी)) - जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

 

यावेळी उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले, उप विभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार सूर्यकांत येवले, डॉ. नारळीकर यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

तत्पूर्वी डॉ. नारळीकर यांचे पार्थिव आयुका येथून वैकुंठ स्माशनभूमी येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली. 

 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन

 

 जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्प चक्र अर्पण केले. 

 

आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) येथे याप्रसंगी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.

 

याप्रसंगी अन्य मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी डॉक्टर नारळीकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी पोलीस दलाने सलामी, शोकशस्त्र तसेच बाजूशस्त्र सलामी दिली. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

 

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती