आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ, महाराष्ट्र भूषण, पदम भूषण, पदम विभूषण डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन
xtreme2day
20-05-2025 16:27:49
76790663
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ, महाराष्ट्र भूषण, पदम भूषण, पदम विभूषण डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

पुणे (विशेष प्रतिनिधी) - जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक आणि मराठी मनाचा मानबिंदू असलेले डॉ. जयंत नारळीकर यांचं वृद्धापकाळाने पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाले.
जयंत नारळीकरांचे वडील प्रसिद्ध गणितज्त्र रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर. ते वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठाचे गणित शाखेचे प्रमुख होते. नारळीकरांचे शालेय शिक्षण हे वाराणसी येथे पूर्ण झालं. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले होते. भारतात परतल्यानंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागात ते प्रमुख पदी काम करू लागले. त्यानंतर 1988 साली त्यांची पुण्यातील आयुका संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती.
जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथासंबंधित पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी या पुस्तकांच्या माध्यमातून विज्ञान हा विषय अत्यंत सोप्या भाषेत समजून सांगितला. चला जाऊ अवकाश सफरीला या पुस्तकातून लहानग्यांच्या जयंत आजोबांनी अंतराळातील विश्व लहान मुलांना कळेल अशा अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलं. त्यांनी वैज्ञानिक संशोधनाबरोबरच विज्ञानविषयक लेखनातून सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचे मोठे कार्य केले आहे.
विपुल लेखन व ग्रंथसंपदा -
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी' मांडली
चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन
'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
विज्ञानकथा पुस्तके
अंतराळातील भस्मासुर
अंतराळातील स्फोट
अभयारण्य
चला जाऊ अवकाश सफरीला
टाइम मशीनची किमया
प्रेषित
यक्षांची देणगी
याला जीवन ऐसे नाव
वामन परत न आला
व्हायरस
अंतराळ आणि विज्ञान
आकाशाशी जडले नाते
गणितातील गमतीजमती (विकिस्त्रोतवरील आवृत्ती)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
विश्वाची रचना
विज्ञान आणि वैज्ञानिक
विज्ञानगंगेची अवखळ वळणे
विज्ञानाची गरुडझेप
विज्ञानाचे रचयिते
समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक)
Seven Wonders Of The Cosmos
सूर्याचा प्रकोप
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.