Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

पाकिस्तानला घेरण्यासाठी 7 शिष्टमंडळे तयार; त्याचा खोटारडेपणा व दहशतवादाविरुद्ध भारत जगाला स्पष्ट संदेश देणार

xtreme2day   17-05-2025 16:29:37   37853399

पाकिस्तानला घेरण्यासाठी 7 शिष्टमंडळे तयार; त्याचा खोटारडेपणा व दहशतवादाविरुद्ध भारत जगाला स्पष्ट संदेश देणार

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताचा संघर्ष सुरू असताना, केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार करण्यात आली आहेत. ही शिष्टमंडळे लवकरच जगातील प्रमुख मित्र राष्ट्रांना भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, शिष्टमंडळे दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि कठोर भूमिका जगासमोर मांडतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचाही यात समावेश असेल. प्रत्येक शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे खासदार, प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आणि अनुभवी राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

 

भारत दहशतवादाच्या समस्येवर नेहमीच कठोर भूमिका घेत आलेला आहे. मुंबईतील 26/11 चा हल्ला असो किंवा इतर सीमापारच्या दहशतवादी घटना, भारताने नेहमीच या कृत्यांचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली आहे.

 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचाही यात समावेश असेल. प्रत्येक शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे खासदार, प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आणि अनुभवी राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश असेल. हे शिष्टमंडळ जगाला दहशतवादाविरुद्ध 'Zero tolerance' चा भारताचा मजबूत संदेश देतील.

 

सात शिष्टमंडळांचे नेतृत्व खालील सदस्य करतील

शशि थरूर, (काँग्रेस)

रविशंकर प्रसाद, (भाजप)

संजय कुमार झा, (जेडीयू)

बैजयंत पांडा, (भाजप)

कनिमोळी करुणानिधी, (डीएमके)

सुप्रिया सुळे, (राष्ट्रवादी काँग्रेस (राशप))

श्रीकांत एकनाथ शिंदे, (शिवसेना)

 

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले, यावरून भारताची बदलती आणि कठोर लष्करी रणनीती दिसून येते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद संपवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही चर्चा होणार नाही. आता, या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या माध्यमातून भारत जगाला दहशतवादाविरुद्ध एकजूट होण्याचे आणि कठोर पाऊले उचलण्याचे आवाहन करणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor)  यांची भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी जवळीक वाढल्याचं मानलं जात आहे. त्यातच  मोदी सरकारने शशी थरूर यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी राजकीय नसून देशहिताची आहे. भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात जाऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची माहिती देणार आहे. या शिष्टमंडळात शशी थरुर यांचाही समावेश करण्यात येणार आहे.  शशी थरूर यांच्यासोबत काँग्रेसचे अन्य काही  खासदार देखील परदेशात जाणार आहेत. तसेच भाजप, जेडीयू, टीएमसीसह इतर राजकीय पक्षांचे खासदारांचाही या शिष्टमंडळात समावेश असेल.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती