Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

अलिबागचे रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटलांना सीनियर वर्ल्ड पुरस्कार जाहीर!

xtreme2day   17-05-2025 16:25:25   4379113

अलिबागचे रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटलांना सीनियर वर्ल्ड पुरस्कार जाहीर!                   

कर्जत ( एडवोकेट गोपाळ शेळके यांजकडून) - देशभरात जेष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या सीनियर वर्ल्ड संस्थेतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अलिबाग चे रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉ. जयपाल पाटील यांना ऑनलाईन सीनियर वर्ल्ड अवॉर्ड जाहीर झाला असून हा पुरस्कार मिळविणारे  रायगड जिल्ह्यातील ते पहिले जेष्ठ नागरिक आहेत.

संपूर्ण देशभरात वयाची 60 वर्षे होऊनही समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या भारतातील  20 महिला व पुरुषांचे विशेष कार्य मागील  1वर्षापासून ऑनलाइन फेसबुकच्या माध्यमातून संस्थेचे पंच पाहत होते डॉ. जयपाल पाटील हे महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार  जनतेला प्रशिक्षण देणारे असून सन 2014  साली  त्यांनी  नागरी  संरक्षण दलाचे सदस्य होऊन बोरी, उरण, होमगार्ड कॉलेज मुंबई येथे प्रशिक्षण घेतले त्याचबरोबर त्यांनी भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रशिक्षण केंद्रातून ऑनलाईन अनेक विषयांवर प्रशिक्षण घेतले आहे.त्यानंतर त्यांना 2015 महाराष्ट्र शासनाने नागरी संरक्षण दल रायगडचे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केले. त्या काळात रायगड जिल्ह्यातील 50 हजार नागरिकांना प्रशिक्षण दिल्याने रायगड जिल्हा परिषदेने त्यांना "रायगड भूषण" म्हणून मानाचा  पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदांमध्ये ते विशेष अतिथी म्हणून सन्मानित होते. त्यांनी 2 चाकी मोटरसायकल अपघात व कोविड नंतर काय? करावे यावर शोधनिबंध लिहिले आहेत. तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने  भारतातील आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करणाऱ्या तज्ञां चे  संमेलनात त्यांना आमंत्रित केले होते, त्यामध्ये त्यांनी "जंगलातील आगी" यावर शोधनिबंध सादर केला होता. त्यांनी आकाशवाणी मुंबईवरून "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा", रत्नागिरी केंद्रावरून "युवक युवतींचे आपत्ती सुरक्षा" सोलापूर केंद्रावरून "कामगारांची आपत्ती सुरक्षा",  कोल्हापूर केंद्रावरून "ज्येष्ठ नागरिकांचे आपत्ती सुरक्षा" आणि पुणे आकाशवाणी वरून "महिलांची  आपत्ती सुरक्षांची" आणि प्रत्यक्ष 605 व्याख्याना द्वारे नागरिकांना प्रशिक्षित केली आहे.या महत्त्वाच्या व इतर सामाजिक कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने "गुणवंत कामगार", "आदिवासी सेवक" "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण"( दलित मित्र) पुरस्कार देऊन सन्मान केला असून सध्या ते रायगड जिल्ह्यातील 811 ग्राम पंचायती मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रम सुरू असून ते एक्सट्रीम टुडे  कोकण प्रमुख म्हणून काम पाहतात, त्यांना जाहीर झालेल्या जागतिक पुरस्काराबद्दल एक्सट्रीम टीम तसेच आम्हीही, संस्थापक संपादक संजय जोशी आणि मित्रपरिवार अभिनंदन करीत आहोत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती