Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार; संरक्षण मंत्रालयाचं बजेट वाढण्याची शक्यता

xtreme2day   16-05-2025 16:42:51   11676209

भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार; संरक्षण मंत्रालयाचं बजेट वाढण्याची शक्यता

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारत सरकारने दहशतवादाविरुद्धचे त्यांचे ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले  आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे सरकार आपले संरक्षण बजेट आणखी वाढवण्याचा विचार करत आहे. लवकरच संरक्षण अर्थसंकल्पाकडून अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी ही अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते. ही अतिरिक्त तरतूद नवीन शस्त्रे आणि दारूगोळा, तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी खर्च करायची आहे. भविष्यातील धोके ओळखून भारत सरकार देशाच्या सुरक्षिततेवर भर देत आहे.  

 

संरक्षण मंत्रालयचा 50 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतुदीचा प्रस्ताव असेल. हिवाळी अधिवेशनात अतिरिक्त निधीसाठी मंजुरी मिळू शकते. यावर्षी संरक्षण बजेट विक्रमी 6.81 लाख कोटी रुपये होते. मोदी सरकार आल्यापासून गेल्या दहा वर्षांत संरक्षण बजेटमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. संरक्षण बजेटमध्ये जवळपास तीन पट वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये संरक्षण बजेट 2.69 लाख कोटी होते. यावेळी ते 6.81 लाख कोटी रुपये आहे, जे एकूण बजेटच्या 13.45 टक्के आहे. इतर सर्व मंत्रालयांमध्ये संरक्षणाचे बजेट सर्वाधिक आहे.

 

आजपर्यंत असलेले संरक्षण बजेट :

वर्ष संरक्षण बजेट (कोटींमध्ये)

2014-15 2,29,000 कोटी रुपये

2015-16 2,46,727 कोटी रुपये

2016-17 3,40,921 कोटी रुपये

    2017–18    3,59,854 कोटी रुपये

2018–19 4,04,365 कोटी रुपये

2019-20 4,31,011 कोटी रुपये

2020–21 4,71,378 कोटी रुपये

2021-22 4,78,196 कोटी रुपये

2022-23 5,25,166 कोटी रुपये

  2023-24    5,93,538 कोटी रुपये

2024-25 6,21,941 कोटी रुपये 

2025-26 6,81,210 कोटी रुपये


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती