पाकिस्तानी दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर याविषयावरचं यापुढे पाकिस्तानबरोबर चर्चा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
xtreme2day
12-05-2025 21:35:44
99057028
पाकिस्तानी दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर याविषयावरचं यापुढे पाकिस्तानबरोबर चर्चा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - संपूर्ण जगाने देशाचे सामर्थ्य आणि संयम दोन्ही पाहिले. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेनेचे, सशस्त्र दलांचे, आपल्या गुप्तचर विभागाचे सर्व भारतीयांकडून सलाम करतो. आपल्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरसाठी असीम साहस दिले. मी त्यांच्या विरतेसाठी, साहस आणि सामर्थ्यसाठी प्रणाम करतो. २२ एप्रिल रोजी पेहलगाममध्ये आतंकवाद्यांनी जे पाप केले त्याने देश आणि जगभरात खळबळ उडाली होती. सुट्ट्यांची मजा घेणाऱ्या निर्दोष नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांच्या मुलांसमोर मारुन टाकणे हा आतंकवादाचा भयंकर चेहरा होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पहलगाम हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. भारतीय हवाई दलाने 7 मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही सीमाभागात गोळीबार केला होता. या सर्व घडामोडी घडत असताना पंतप्रधान मोदींनी मात्र अद्याप भाष्य केले नव्हते. अशातच आता पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच देशवासियांना आज संध्याकाळी 8 वाजता दूरदर्शनवर संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा देताना आत्ता फक्त पाकिस्तानी दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर याविषयावरचं यापुढे पाकिस्तानबरोबर चर्चा होईल, याची नोंद विश्व समुदायाने घ्यावी असेही म्हटले आहे.
माझ्यासाठी व्यक्तिगत रित्या ही वेदना असह्य होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाईसाठी एकजूट झाला होता. दहशतावादाला गाडण्यासाठी आम्ही सैन्याला पूर्ण सूट दिली होती. दहशतवादी संघटना, दहशतवाद्यांना हे कळून चुकले आहे की माता भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचा परिणाम काय असतो. ऑपरेशन सिंदूर हे एक नाव नाहीये, ते देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींच्या कपाळावरील कुंकू पुसले म्हणून , भारताना दहशतावद्यांचे अड्डे उद्ध्व्स्त केले. भारताने 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवाद्यांचे अनेक म्होरके पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत होते. त्या म्होरक्यांना भारताने एका झटक्यात संपवले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान निराशेच्या गर्तेत गेला होता, त्यातूनच त्यांनी दुसरे पाऊल उचलले , भारतावर हल्ला सुरू केला. पाकिस्तानने शाला, कॉलेज, गुरुद्वारे, मंदिरे, सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले. पाकिस्तानने आमच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष्य केले, मात्र यातही पाकिस्तानचा बुरखा फाटत गेला, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर तोफ डागली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.