xtreme2day 09-05-2025 17:49:29 75413046
देशवासियांना आणि त्या दु:खी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी पाकिस्थानवर ही कारवाई ; यामुळे स्वाभिमान आणि देशाच मनोधैर्य दोन्ही उंचावलं - सरसंघचालक मोहन भागवत नागपूर (विशेष प्रतिनिधी) - पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निर्णायक कारवाई सुरु आहे. त्यासाठी RSS प्रमुख मोहन भागवत यांनी केंद्र सरकारच नेतृत्व आणि तिन्ही सैन्य दलांना शुभेच्छा दिल्या आहेत. “26 हिंदू पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर देशात संतापाची भावना होती. देशवासियांना आणि त्या दु:खी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यामुळे स्वाभिमान आणि देशाच मनोधैर्य दोन्ही उंचावलं आहे” असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पाकिस्तानातील त्यांचे समर्थक यांच्याविरोधात कारवाई करण आवश्यक होतं तसच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे गरजेच होतं. त्यामुळे आम्ही या कारवाईच समर्थन करतो” असं आरएसएस प्रमुखांनी म्हटलं आहे. या संकटकाळात संपूर्ण देश सरकार आणि सैन्य दलांसोबत उभा आहे असं आरएसएसने म्हटलं आहे. “भारताच्या सीमेवरील नागरीवसत्या आणि धार्मिक स्थळांवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. हा अमानवीय हल्ला झेलणाऱ्या पीडितांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटल आहे. सध्याच्या या आव्हानात्मक काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासियांना अपील करतो की, सरकार आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांच पालन करा. “नागरी कर्तव्य बजावताना राष्ट्रविरोधी शक्तींमुळे आपलं सामाजिक ऐक्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसच लष्कर आणि नागरी प्रशासनाला गरज असेल तेव्हा मदत करण्यासाठी तत्पर रहाण्याची आणि सर्व देशवासियांना राष्ट्रभक्ती दाखवण्याची आरएसएसकडून विनंती करण्यात आली आहे”: