Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या ! अमेरिकेचा भारताला पाठिंबा; भारतावर हल्ला केला तर.., पाकिस्तानला दिला थेट इशारा

xtreme2day   08-05-2025 23:28:54   77588710

पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या ! अमेरिकेचा भारताला पाठिंबा; भारतावर हल्ला केला तर.. पाकिस्तानला दिला थेट इशारा 

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आणि सतत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानंतर आता अमेरिकेनं पाकिस्तानला कडक इशारा दिला आणि भारताच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा व्यक्त केला आहे. 

 

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता, आज सकाळी भारताकडून पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या 15 शहरांवर 50 ड्रोन हल्ले केले, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टीम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, मात्र तरी देखील पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, पुन्हा एकदा आता पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारताच्या डिफेंस सिस्टमनं हे हल्ले परतून लावले आहेत. पाकिस्तानच्या आठ मिसाईल पाडण्यात आल्या असून, अनेक ड्रोन देखील पाडण्यात आले आहेत. 

 

भारतानं या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला केला आहे, लाहोरवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तान आणि भारतामधील तणाव प्रचंड वाढला असून, याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, अमेरिकेनं भारताला पाठिंबा दिला आहे. दहशतवाद्याच्या विरोधात आम्ही भारतासोबत आहोत, कोणत्याही कृतीला उत्तर दिलं जाईल अशी भूमिका अमेरिकेनं आता घेतली आहे, याबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे, तसेच अमेरिकेकडून पाकिस्तानला युद्ध न करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. युद्ध करू नका असं अमेरिकेनं म्हटलं आहे. 

 

दरम्यान पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर आज हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, भाराताच्या सीमेला लागून असलेले शहर टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. मात्र भारतानं पाकिस्तानचा हा हल्ला परतून लावला आहे. पाकिस्तानचे आठ मिसाईल आणि अनेक ड्रोन पाडण्यात आले आहोत. पाकिस्ताननं भारताचे तीन राज्य पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जम्मू विद्यापीठ आणि विमानतळ पाकिस्तानच्या रडारवर होते. मात्र भारताच्या डिफेंस सिस्टमने हा हल्ला परतून लावला आहे, त्यानंतर आता भारतानं पाकिस्ताच्या लाहोरवर हल्ला केला आहे. पाकिस्ताननं पुन्हा केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर भारतानं अमेरिकेसोबत चर्चा केली, यावेळी आम्ही दहशतवादाविरोधात भारतासोबत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
WuHmjmrgmt 09-05-2025 04:27:31

xtreme2day.com
UgVkRRllUfA 09-05-2025 16:50:36

xtreme2day.com
OPrcYuyzXAP 09-05-2025 16:52:58

xtreme2day.com
fcHobNlahRsh 09-05-2025 17:39:23

xtreme2day.com
pSNVXZzEIpF 10-05-2025 08:31:18

xtreme2day.com
eftysGhjELGw 10-05-2025 21:30:12

xtreme2day.com
dIReGPIKYMSed 11-05-2025 10:13:33

xtreme2day.com
OmrDZZjzk 14-05-2025 08:39:16

xtreme2day.com
QeuccftWrM 15-05-2025 09:15:51

xtreme2day.com
tJBvNYaaLTMa 16-05-2025 15:23:32

xtreme2day.com
dGKBkxlq 17-05-2025 08:00:46

xtreme2day.com
ixwrMbFpuX 17-05-2025 18:59:35

xtreme2day.com
mfGuFSvTO 18-05-2025 18:48:54

xtreme2day.com
bBKzixtopj 18-05-2025 21:16:36

xtreme2day.com
bjKaJnWI 19-05-2025 00:58:46

xtreme2day.com
tFfYoGpdvPkwMGl 19-05-2025 09:02:33

xtreme2day.com
tvhcEiJC 20-05-2025 06:02:55

xtreme2day.com
CEThgIKnPo 20-05-2025 13:07:37

xtreme2day.com
igEpAsgCUx 20-05-2025 15:56:05


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती