xtreme2day 02-05-2025 21:01:10 30987610
भेंडवळच्या भाकीतामध्ये भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठी भविष्यवाणी सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे युद्ध होणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. याबाबत देखील मोठं भाकीत भेंडवळच्या घट मांडणीत वर्तवण्यात आलं आहे. सीमेवर तणावाची स्थिती राहील असं म्हटलं आहे. तसेच मान्सूनच्या पहिल्या महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील, दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस होईल, तिसऱ्या महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असेल, तर चौथ्या महिन्यात अवकाळी पावसाचा फटका बसेल असं भेंडवळच्या घट मांडणीनंतर वर्तवण्यात आलं आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत आज भेंडवळ येथे भाकीत वर्तविण्यात आले आहे, अक्षय तृतीयेच्या पूर्वसंधेला ही घट मांडणी करण्यात आली, त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवण्यात आले आहे. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकीत वर्तवलं आहे. राजा म्हणजेच पंतप्रधान तणावात राहातील, परकीयांचा त्रास होईल मात्र संरक्षण खातं मजबूत आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, मात्र युद्ध होणार नाही, असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.