Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

थॅलेसेमिया मुक्त भारतासाठी सर्वंकष, संघटित प्रयत्नाचा पुण्यात निर्धार

xtreme2day   08-04-2025 17:24:10   6578969

थॅलेसेमिया मुक्त भारतासाठी सर्वंकष, संघटित प्रयत्नाचा पुण्यात निर्धार

 

पुणे (प्रतिनिधी) - थॅलेसेमिया या रक्ताच्या गंभीर आजारावर रुग्णांचे उपचार व्यवस्थापन, वाहक शोध आणि समाजप्रबोधन या त्रिसूत्रीवर काम करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ आणि ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’ यांच्या वतीने संयुक्त प्रयत्न केले जाणार असून त्याचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आले.

 

पुण्यातील ‘सेवा भवन’ येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून या उपक्रमासंबंधीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, ‘जनकल्याण समिती‘चे अध्यक्ष डॉ. अजित मराठे, ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. थॅलेसेमिया या समस्येच्या संदर्भात काम करणारी रक्त केंद्र आणि सामाजिक संस्थांना एकत्र आणून त्यांच्या कार्याचे सुसूत्रिकरण ‘जनकल्याण समिती’ आणि ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’ यांच्यातर्फे केले जाणार आहे.

 

जेव्हा सामूहिक व प्रभावी प्रयत्न होतात तेव्हा वैद्यक क्षेत्रासमोर येणाऱ्या नित्य नवीन आव्हानांवर मात करता येते, असे पूर्वीचा इतिहास सांगतो. अशाच पद्धतीचे प्रयत्न सर्वांनी मिळून आणि सर्वंकष पद्धतीने आपण केले तर आपण याही आव्हानावर मात करून थॅलेसेमिया मुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असा विश्वास भय्याजी जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.

 

रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी या समस्येच्या वेगवेगळ्या अंगांचा विचार प्रतिनिधींसमोर मांडला. डॉ. चिन्मय उमरजी यांनी आजाराची शास्त्रीय माहिती आणि सध्याचे प्रचलित व्यवस्थापन याची माहिती दिली. थॅलेसेमिया सोसायटी पुण्याच्या अध्यक्ष डॉ. नीता मुन्शी आणि राज्य रक्त संक्रमण परिषद, सहाय्यक संचालक, डॉ. महेंद्र केंद्रे यांनी थॅलेसेमिया आजार आणि त्याच्याशी सामना करण्यासाठी आवश्यक प्रयत्न या विषयावर मार्गदर्शन केले.

 

थॅलेसेमिया रुग्णांचे व्यवस्थापन या विषयावर संभाजीनगरच्या डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि डॉ. लिझा बलसारा यांनी थॅलेसेमिया मुक्त समाजासाठी थॅलेसेमिया तपासणी या विषयावर डॉ. अतुल कुलकर्णी आणि डॉ. अमर सातपुते यांनी तसेच थॅलेसेमिया विषयाचे व्यापक समाज प्रबोधन या विषयावर प्रदीप पराडकर आणि डॉ. आशुतोष काळे यांनी चर्चा समन्वयन केले. 

 

थॅलेसेमिया हा रक्ताचा एक अनुवांशिक आणि अतिशय गंभीर आजार आहे. वाहक पती-पत्नी एकत्र आले तर मुलांना हा आजार होतो. या आजारावर आज किफायतशीर  उपचार नसल्यामुळे ठराविक कालावधीनंतर वारंवार त्यांना रक्त द्यावे लागते. या आजाराबाबतचा सर्वंकष विचार कार्यशाळेत करण्यात आला. राज्यातील १८ जिल्ह्यांतील २४ संस्थांचे तसेच १५ रक्त केंद्रांचे प्रतिनिधी कार्यशाळेत उपस्थित होते. या आजाराच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या विविध संस्थांचा सत्कारही कार्यशाळेत करण्यात आला. 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
uZswBgLHfpKYsYc 08-04-2025 19:20:14

xtreme2day.com
📱 + 1.9095 BTC.GET - https://graph.org/Message--17856-03-25?hs=36c7e74ddb09a836280050d3a8470ede& 📱 08-04-2025 20:32:55

i7amlw

xtreme2day.com
zkVVRbEPDxlCxua 09-04-2025 00:17:33

xtreme2day.com
TXUEigMQV 09-04-2025 06:23:25

xtreme2day.com
CMOQZnpedNuRnvj 10-04-2025 23:57:57

xtreme2day.com
TTKmHIzmC 12-04-2025 16:44:49

xtreme2day.com
FsYWaKZy 13-04-2025 00:44:35

xtreme2day.com
UZtMjXVNWYPKf 13-04-2025 08:35:17

xtreme2day.com
LSfahrgCL 16-04-2025 07:12:37

xtreme2day.com
owConzYUThXy 17-04-2025 16:56:37

xtreme2day.com
TRyxzRmbNvSWvHi 17-04-2025 23:02:56

xtreme2day.com
OkMpFEXwOOA 18-04-2025 04:28:13

xtreme2day.com
wTzCBYCwygTQb 18-04-2025 07:30:59


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती