xtreme2day 21-03-2025 15:17:49 25631110
कर्नाटकात 'हनीट्रॅपमध्ये फसले 48 नेते'; पेनड्राईव्ह, CD चा उल्लेख करत मंत्र्यांकडून मोठा गौप्यस्फोट नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - कर्नाटकात 'हनीट्रॅपमध्ये फसलेल्या जवळपास ४८ नेत्यांची सीडी, पेनड्राइव्ह बनलेत. त्यात राज्यासोबत केंद्रातील मंत्र्याचाही समावेश आहे असा आरोप करत मंत्री केएन राजन्ना यांनी कर्नाटकात खळबळ उडवून दिली. देशाच्या राजकीय वर्तुळात नुकताच एक इतका मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे, ज्यानंतर आता राजकारणात भूकंप येण्याचे संकेत मिळत आहेत. राजन्ना यांच्या मागणीनंतर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. अनेक राजकीय पक्षातील ४८ नेते हनी ट्रॅपमध्ये फसले आहेत. हे प्रकरण केवळ कर्नाटकपुरतं मर्यादित नाही. राष्ट्रीय पातळीवर हे पसरलं आहे. त्यात देशातील अनेक पक्षातील नेत्यांचा समावेश आहे असं मंत्री केएन राजन्ना म्हणाले. राजन्न यांचा मुलगा आमदार राजेंद्र राजन्ना यांनीही या आरोपांवर पुष्टी दिली. मागील ६ महिन्यापासून मला आणि माझ्या वडिलांसोबत हे सुरू आहे. आम्हाला वाटायचे हे सामान्य फोन कॉल किंवा व्हिडिओ कॉल असतील. परंतु दिवसेंदिवस कॉल वाढत गेले. मी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला असून गृहमंत्र्यांची चौकशीचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. या सदर हनी ट्रॅप प्रकरणात मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध लागलाच गेला पाहिजे असा आग्रही सूर आळवत यावेळी मंत्र्यांनी हा सामाजिक मुद्दा झाल्याची बाब अधोरेखित केली. दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेनं मंत्र्यांच्या हवाल्यातून दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकरणी कर्नाटकातील मंत्र्यांनी तपासाची मागणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. यानंतर कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्याचंही वक्तव्य केलं. सदनाच्या मर्यादेचं पालन करायचं असल्यास अशा प्रकारच्या मुद्द्यांवर तोडगा निघालाच पाहिजे असं म्हणत परमेश्वर यांनी राजन्ना यांच्याक़डून लिखित स्वरुपात विनंतीपत्र देण्यात आल्यास उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देत सत्य समोर आलंच पाहिजे असा आग्रही सूर आळवला. दरम्यान, मागील 6 महिन्यांपासून नेत्यांच्या फसवणुकीसाठीचे प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती राजन्ना यंच्या मुलानं दिली. याचदरम्यान काँग्रेस नेता सतीश जरकीहोली यांनीसुद्धा आपल्याला याआधी हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा कट रचल्याचं म्हटलं. तेव्हा आता या हनी ट्रॅप प्रकरणी तपास होत नेमका काय निष्कर्ष निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
swk0lt