रायगड खारलँड 15 कोटी वर स्थगिती ; होळी धुळवडीला कंत्राटदारांचे हाल
xtreme2day
14-03-2025 21:31:13
8942974
रायगड खारलँड 15 कोटी वर स्थगिती ; होळी धुळवडीला कंत्राटदारांचे हाल
अलिबाग:-( डॉ. जयपाल पाटील यांजकडून) रायगड जिल्ह्यात खारलँडची 15 कोटीची कामाबाबत नांदेड बीड खामगाव येथील कंत्राटदारांनी अनेक कामाच्या कमी किमतीची टेंडर दाखल केली होती व त्यांना खारलँड कामाचा अनुभव नसल्याने सचिवांनी ती टेंडर रद्द केल्याने 15 कोटीचा निधी पुढील वर्षासाठी गेल्याने अत्यावश्यक व तातडीच्या कामांची बिले स्थानिक कंत्राटदारांना न मिळाल्यामुळे त्यांची होळी धुळवड अडचणीची गेली, बिलांसाठी खारलॅंड ऑफिस पेण येथे हेलपाटे मारून अखेर थकून गेले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की कोकणात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे किनाऱ्यावरील शेजारी गावांसाठी खारलॅंड विभागाची 575 योजना कार्यरत आहेत आणि यामध्ये रायगड जिल्ह्यात अरबी समुद्रकिनारी 165 गावे आहेत. बॅरिस्टर ए.टी. पाटील यांच्या नंतर पहिल्यांदाच मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्याकडे हे खाते आले असल्याने पेण येथील शिंदे गटाचे कार्यकर्ते यांनी कर्नाटक दरांवर आलेली ही आपत्ती कथन केली, त्यांनी तातडीने त्यांच्या खात्याच्या सचिवांना बोलावून तातडीने माहिती घेतली, रायगडच्या बाहेरील जिल्ह्यातील कंत्राटदारांनी शासनाने ठरविलेल्या किमतीपेक्षा कमी दराने टेंडर टाकली असून 31 मार्चपर्यंत कागदपत्रांची छाननी होऊ शकत नाही. आणि या कंत्राटदारांना कोणताच या समुद्रातील कामाचा अनुभव नाही म्हणून हे टेंडर रद्द केली आहेत असे मंत्री महोदयांना सांगण्यात आले. त्यांनी विचारले की यापूर्वीही काम कोण करायचे, त्यांना सांगण्यात आले की समुद्रकिनाऱ्यावरील ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे ते गावकरी हे काम करीत असतात, मोठ्या उदाहरणाच्या वेळी समुद्राचे पाणी शेतात घुसते व शेती पिके नाशी होते, अशावेळी बंदिस्त फुटली तातडीने अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव करी कामे करतात, गावातील श्रीमंत माणूस त्या कामासाठी लागणारी मजुरी, साहित्य याचा खिशातून खर्च करतो, त्याला अधिकारी कंत्राटदार असे म्हणतात मग निधी आला की त्याचे बिल अदा केले जाते अशी अनेक वर्षाची कामाची प्रथा आहे. मंत्री भरत शेठ गोगावले यांनी असा निर्णय घेतला की अशी आयत्या वेळेची कामे ज्यामुळे समुद्राच्या पाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व ती कामे स्थानिक अनुभवी कंत्राटदारांना गावकऱ्यांना मिळावी आणि त्याची पुढील वर्षापासून अंमलबजावणी व्हावी, व ते 15 कोटी रुपये पुढील वर्ग करावेत असे आदेश दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
यामुळे 15 कोटी यावर्षीचे रायगडचे गेले तरी पुढील काळासाठी स्थानिक कंत्राटदार व गावकऱ्यांचे कल्याण नामदार भरत शेठ गोगावले यांनी केल्याबद्दल त्यांना दुवा देत आहे याबाबत झालेल्या घटनेमुळे खारलॅंड चे सर्व अधिकारी यांनी मागील 15 दिवसात कार्यालयात त्यांच्यावर पडलेल्या विविध पडलेल्या फुलांची माहिती प्रत्यक्ष भेटीत दिली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.