विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी व २१ व्या शतकातील कौशल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने बालेवाडी येथे राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा संपन्न
xtreme2day
13-03-2025 20:42:35
17854555
विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी व २१ व्या शतकातील कौशल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने बालेवाडी येथे राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा संपन्न
पुणे (विशेष प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी व २१ व्या शतकातील कौशल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी येथे राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा १२ मार्च रोजी संपन्न झाली.
यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. माधुरी सावरकर, श्रीमती ज्योती शिंदे तसेच प्रशिक्षण परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प तयार करण्यासाठी आरोग्य, कृषी, वाहतूक व दळणवळण, दर्जेदार शिक्षण, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरीविकास, स्वच्छता, अन्न आणि पोषण, परवडणारी व स्वच्छ उर्जा, लिंग समभाव, सांस्कृतिक वारसा, प्रदूषण, डिजिटल सुरक्षा, संगणकीय विचार अशा १५ थीम्स देण्यात आल्या. या उपक्रमात ३६ जिल्हे, ८ हजार ९७८ शिक्षक,९ हजार २३ शाळा व १७ हजार ९५६ विद्यार्थी सहभागी झाले. राज्यस्तरावर एकूण ८८ शिक्षक व २६३ विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादरीकरण केले.
प्रकल्पांच्या सादरीकरणाच्या परीक्षणानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा व खाजगी अनुदानित शाळा या गटातून प्रत्येकी ३ क्रमांकांची निवड करण्यात आली.
*स्थानिक स्वराज्य संस्था* :
यवतमाळ जिल्ह्यातील सय्यद साहेबलाल शेख, प्रणाली प्रवीण मुटकुळे, संजीवनी प्रल्हाद मुटकुळे यांच्या बालसुरक्षा प्रकल्पाला प्रथम क्रमांक, सांगली जिल्ह्यातील सुनील आनंदा पाटील, श्रेया मारुती कुंभार, अंजली संभाजी साळुंखे यांच्या शाश्वत स्मार्ट इलेक्ट्रिक व सोलर वायरलेस चार्जिंग सिस्टीम या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक तर धाराशिव जिल्ह्यातील दिपाली सबसगी, वैष्णवी प्रशांत नवले, मानसी अविनाश गावकरे यांच्या भरडधान्यला तृतीय क्रमांक देण्यात आला.
*शासकीय शाळा* :
सोलापूर जिल्ह्यातील शाम्बूसिंग बरोली, जमीर जमादार, जुबेद जमादार यांच्या बहुउपयोगी शेती यंत्रला प्रथम, यवतमाळ जिल्ह्यातील मंगेश सुरुषे, हर्षद शेले यांच्या शाश्वत पवन उर्जा प्रकल्पाला द्वितीय क्रमांक तर नागपूर जिल्ह्यातील पंकज कुणालराव तेरडे, संबोधी दुधे, श्रावणी वरुडे यांच्या ब्लूटूथ कनेक्टेड व्हीलचेअरला तृतीय क्रमांक देण्यात आला.
*खाजगी अनुदानित शाळा* :
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सतीशकुमार कुर्ले, सार्थक कुर्ले, अथर्व फाटक यांच्या मासे विक्रेत्यांसाठी ट्रॉली- प्रथम क्रमांक, कोल्हापूर जिल्ह्यातील युवराज पाटील, शुभश्री डाफळे, प्रियंका पाटील यांच्या सेफ्टी कँडलला द्वितीय व गडचिरोली जिल्ह्यातील एन. एम. वाईकर, खुशी बोदेले व वैष्णवी सुर्यवंशी यांच्या अन्नसुरक्षा डबा या प्रकल्पाला तृतीय क्रमांक देण्यात आला.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.