Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

मुबंई होणार अधिक सुपरफास्ट ; लोकल स्थानके आणि मुंबई मेट्रो रोपवे-पॉड टॅक्सीने जोडणार

xtreme2day   04-03-2025 23:00:03   19192527

मुबंई होणार अधिक सुपरफास्ट ; लोकल स्थानके आणि मुंबई मेट्रो रोपवे-पॉड टॅक्सीने जोडणार

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - देशातील आर्थिक राजधानी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प प्रशासनाकडून राबवण्यात येत आहेत. त्यातीच एक प्रकल्प म्हणजे वांद्रे-कुर्ला संकुलातील पॉड टॅक्सी. पॉड टॅक्सीमुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवासदेखील जलद होणार आहे. मुंबईप्रमाणेच एमएमआरमधील मेट्रो स्थानके व आसपासच्या परिसराशी नजीकच्या रेल्वे स्थानकांशी जोडण्यासाठी पॉडटॅक्सीचा पर्याय स्वीकारण्यात आला असतानाच आता रोप-वेचाही पर्याय मिळणार आहे. 

 

एमएमआरमधील मेट्रो स्थानके पॉड टॅक्सीने जोडण्यात येणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलनंतर मीरा-भाईंदर पालिका हद्दीत पॉड टॅक्सीची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. भाईंदर पाडा ते विहंग हिल या एक किमीच्या 40 मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही पॉडटॅक्सी धावणार आहे. तर, मीरा-भाईंदर पालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील 60 मीटर रस्त्यावरही चालवली जाणार आहे. या पॉड टॅक्सीचा वेग 60 ते 70 किमी इतका असणार असून एकावेळी 16 प्रवासी जाऊ शकणार आहेत.  एमएमआरमधील मेट्रो स्थानके नजीकच्या रेल्वे स्थानकाला जोडण्यात यावी यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता रोपवेचाही पर्याय राबवला जाणार आहे. एमएमआरमधील मेट्रो स्थानके रोपवेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. त्याचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळं प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. 

 

एमएमआरमध्ये पॉड टॅक्सीसह रोप वे प्रकल्प राबविण्यासाठी एमएमआरडीएकडून (MMRDA) सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. कोणते मेट्रो स्थानक रोपवे द्वारे तर कोणते मेट्रो स्थानक पॉडटॅक्सीद्वारे जोडता येईल याचा अभ्यास करून आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पॉडटॅक्सी आणि रोपवेचा आराखडा एकत्रितच केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी लागणार असल्याचे म्हणत त्यादृष्टीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सध्या एमएमआरडीएकडून सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात एमएमआरमध्ये मेट्रोसह रोप वे आणि पॉड टॅक्सीसारख्या सुविधा प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यास मदत करतील.दरम्यान, एमएमआरडीएच्या माध्यमातून एमएमआरमध्ये 337 किमीचे मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यातील काही मार्गिका सध्या वाहतूक सेवेत दाखल केल्या आहेत. काही मार्गिका येत्या काही वर्षात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
HqpPeDtIdOKwV 30-03-2025 17:25:47

xtreme2day.com
clmhZnAwe 04-04-2025 01:01:00

xtreme2day.com
eitGOZyiTZxeimU 07-04-2025 08:49:16

xtreme2day.com
pPPWEBen 07-04-2025 13:47:07

xtreme2day.com
ihaMzjKMaUqJ 07-04-2025 20:25:37

xtreme2day.com
kqHtnIDP 08-04-2025 06:15:58

xtreme2day.com
SJMoKLblLQiGoMg 08-04-2025 15:21:45

xtreme2day.com
oaefayMwerFuS 05-03-2025 01:17:21

xtreme2day.com
bHmWKgAMEFLr 06-03-2025 04:07:36

xtreme2day.com
zCJoCvstUr 07-03-2025 11:18:33

xtreme2day.com
FtjHlvVWgJyHzU 26-03-2025 22:58:53

xtreme2day.com
qvWQDWPpQ 27-03-2025 22:44:27

xtreme2day.com
SCvhjzDXzM 29-03-2025 03:13:03

xtreme2day.com
yzKtkNIeeEyV 30-03-2025 10:03:01

xtreme2day.com
RghhKwAIwEAmblW 23-03-2025 20:34:33

xtreme2day.com
spKGPYOpfFX 24-03-2025 13:48:54

xtreme2day.com
phfQbCRQXmzR 25-03-2025 18:29:14

xtreme2day.com
TUjQhrnwqXBf 19-03-2025 13:48:01

xtreme2day.com
xoNxOzrPuxssW 20-03-2025 18:11:17

xtreme2day.com
hFrHzSmf 22-03-2025 14:32:39

xtreme2day.com
CldLEGCoTUvrJk 23-03-2025 05:32:56

xtreme2day.com
XqlcNMtKveGVd 12-03-2025 14:30:35

xtreme2day.com
ihnTLVznOihw 14-03-2025 19:31:37

xtreme2day.com
VvqOFYkn 16-03-2025 11:01:46

xtreme2day.com
pFKoiwxzqQUNwq 17-03-2025 05:40:38

xtreme2day.com
dmlottEgeORpKjj 18-03-2025 09:25:25

xtreme2day.com
FDcrjqWD 08-03-2025 10:00:21

xtreme2day.com
IAtyGugwwEQvN 09-03-2025 05:19:49

xtreme2day.com
owJSCsbHxgFDLi 10-03-2025 10:07:45


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती