xtreme2day 13-02-2025 21:47:37 9910133
अदाणी ग्लोबल स्किल अकॅडमीचा भारतातील सगळ्यात मोठा कौशल्य आणि रोजगार उपक्रम; मेक इन इंडिया उपक्रमाला मिळणार बळकटी मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'सेवा साधना है, सेवा प्रार्थना है और सेवा ही परमात्मा है,' हा मंत्र जपणाऱ्या अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी आणखी एका उपक्रमाची घोषणा केली आहे. अदाणी समूहाने सिंगापूर स्थित ITE एज्युकेशन सर्व्हिस (ITEES) सोबत हातमिळवणी करत कौशल्य विकास संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग क्षेत्राची गरज ओळखत त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ या संस्थेद्वारे पुरविण्यात येणार आहे. हरीत उर्जा, उत्पादन क्षेत्र, उच्च तंत्रज्ञान यासह अनेक क्षेत्रांना कुशल मनुष्यबळाची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याचा ही संस्था प्रयत्न करणार आहे. उद्योगांसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ विकसित करण्यासाठी सुरू करण्यात येणारी ही संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेची असणार आहे आणि यासाठी अदाणी समूहाने 2 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेला 'अदाणी स्किल अकॅडमी' असे नाव देण्यात येणार आहे. या संस्थेमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या तरुणांची निवड केली जाणार आहे. या तरुणांनी निवडलेल्या क्षेत्रासाठीचे त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना अदाणी समूहासह इतर उद्योगांमध्ये रोजगार दिला जाणार आहे. या संस्थेतून बाहेर पडताक्षणीच त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने त्यांना घडविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जागतिक दर्जाची कौशल्य विकास संस्था उभारण्यात येणार आहे. ही संस्था गुजरातमधील मुंद्रा येथे उभी राहणार आहे. या संस्थेतून वर्षाला 25 हजार तरूण कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतील असे अदाणी समूहाने म्हटले आहे. ITI आणि पॉलीटेक्निकमधून शिकून नुकतेच बाहेर पडलेले गुणवंत विद्यार्थी हेरण्यासाठी विशेष कँप लावण्यात येणार आहेत. यातून निवडक तरुणांना या संस्थेमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. अदाणी ग्लोबल स्किल अकॅडेमी ही भारतातीलच नाही तर जगातील एकमेवाद्वितीय ठरण्याची शक्यता आहे. कारण या संस्थेमध्ये इनोव्हेशन सेंटर असणार आहेत तसेच एआय वर आधारीत सिम्युलेटर्स असणार आहेत. या संस्थेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची राहण्याचीही व्यवस्था असणार आहे. संस्थेमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी अदाणी समूहाने सिंगापूरस्थित ITEES या संस्थेशी हातमिळवणी केली आहे. या संस्थेचा रोजगाराभिमुख तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी लौकीक आहे. ITEES सिंगापूरचे सीईओ, सुरेश नटराजन यांनी याबाबत बोलताना म्हटले की, "कौशल्य विकासाला अधिक बळ मिळावे आणि त्याचा शिक्षण तसेच लोकांच्या आयुष्यावर दूरगामी चांगला परिणाम व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
psjc86