xtreme2day 12-02-2025 20:55:51 5647207
IRCTC पोर्टलवर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत ; भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रायगड (जयपाल पाटील यांजकडून) -भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १५ फेब्रुवारी २०२५ पासून महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवासात मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. या नवीन धोरणामुळे महिला प्रवाशांना ५०% तर पुरुष प्रवाशांना ४०% सवलत मिळणार आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात ही सेवा बंद करण्यात आली होती, मात्र आता ती पुन्हा सुरू होत असून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. सवलतीची पात्रता आणि निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट निकष ठेवण्यात आले आहेत. ५८ वर्षांवरील महिला आणि ६० वर्षांवरील पुरुष या सवलतीसाठी पात्र असतील. मात्र ही सुविधा केवळ भारतीय नागरिकांसाठीच मर्यादित आहे. विशेष म्हणजे ही सवलत फक्त सामान्य तिकीट बुकिंगवर लागू होईल, तात्काळ तिकिटांवर ही सूट उपलब्ध नसेल. ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया आधुनिक काळात बहुतांश प्रवासी ऑनलाइन बुकिंगला प्राधान्य देतात. IRCTC पोर्टलवर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रथम IRCTC वेबसाइटवर खाते तयार करावे लागेल. त्यानंतर प्रवासाचा तपशील भरताना “ज्येष्ठ नागरिक सवलत” हा पर्याय निवडावा लागेल. वय सिद्ध करण्यासाठी वैध कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. पेमेंट केल्यानंतर सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध होईल.
वरील प्रमाणे जेष्ठ नागरिकांना सवलती मिळाल्यास मोदी सरकारचे चांगले काम राहील ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या सवलत नसल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे