xtreme2day 03-02-2025 20:25:15 45674288
पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताला स्थान ; ग्लोबल फायरपॉवरने जगातील सर्वात शक्तिशाली सामर्थ्य असलेल्या देशाची यादी केली जाहीर नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - ग्लोबल फायरपॉवरने जगातील सर्वात शक्तिशाली सामर्थ्य असलेल्या देशाची यादी जाहीर केली आहे. पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताने पहिल्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. जगातील सर्व देशांच्या सैन्याच्या फायर पॉवरचे मूल्यांकन करण्यासाठी ग्लोबल फायरपॉवर ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी ही संस्था 60 पेक्षा जास्त पॅरामीटर्सच्या आधारे ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स तयार करते. ज्यामध्ये लष्करी तुकड्या, आर्थिक स्थिती, रसद क्षमता आणि भौगोलिक स्थान आणि तांत्रिक प्रगती यांचा समावेश होतो. या आधारावर जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्लोबल फायरपॉवर यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. ग्लोबल फायरपॉवर ऑर्गनायझेशनच्या या क्रमवारीत जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर, रशिया दुसऱ्या स्थानावर आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे.गतवर्षीप्रमाणे यंदाही भारत स्थानावर स्थिर आहे. या यादीत पाकिस्तानचे स्थान घसरले आहे. फुशारक्या मारणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा एकदा जागतिक पातळीवर फजिती झाली आहे. 2024 मध्ये पाकिस्तान हा देश फायरपॉवर रँकिंगमध्ये 9व्या स्थानावर होता. मात्र, 2025 च्या यादीत पाकिस्तान 12व्या स्थानावर घसरला आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक पातळीवर पाकिस्तानची पीछेहाट झाली आहे. या यादीत भूतान सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.