Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

कौन बनेगा मुख्यमंत्री ! महाराष्ट्रात भाजप सरप्राईज देणार !! ओबीसी - मराठा फॅक्टरचा होतोय विचार ; भागवत कराड, पंकजा मुंडे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ नावं विचाराधीन

xtreme2day   28-11-2024 18:32:26   27689245

कौन बनेगा मुख्यमंत्री ! महाराष्ट्रात भाजप सरप्राईज देणार !!

ओबीसी-मराठा फॅक्टरचा होतोय विचार ; भागवत कराड, पंकजा मुंडे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ यांची नावं विचाराधीन !!

(संजयकुमार जोशी यांजकडून)

 

  महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १२० तासांहून अधिकचा कालावधी झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप सरप्राईज देण्याची शक्यता वाढली आहे. भाजप मुख्यमंत्रिपदी कोणाची निवड करणार याची उत्सुकता आहे. कारण जेव्हा जेव्हा भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यासाठी ७२ तासांपेक्षा अधिक कालावधी घेतला, तेव्हा तेव्हा त्यांनी धक्कातंत्र वापरलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी ओबीसी-मराठा फॅक्टर महत्वाचा मुद्दा असल्याने केंद्रीय मंत्री भागवत कराड, आ.पंकजा मुंडे, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले विनोद तावडे किंवा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात येईल असे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. दरम्यान, राज्यातील विविध घटकांचा विचार केला असता भाजपचे ज्येष्ठ नेते व समर्थकांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व देण्यासाठी आग्रह धरला आहे. 

 

जेव्हा जेव्हा भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यासाठी ७२ तासांपेक्षा अधिक कालावधी घेतला आहे, तेव्हा तेव्हा त्यांनी धक्कातंत्र वापरलं आहे. विविध ठिकाणी भाजपाने मुख्यमंत्री निवडीसाठी जी धक्कातंत्र वापरली त्याचा फायदा पक्षाच्या वाढीसाठी झाला आहे आणि हिंदुत्ववाढीसाठीही मोठा उपयोग होतं असल्याने महाराष्ट्र राज्यात नवीन नेतृत्व उभे राहिले पाहिजे असा प्रयत्न करण्यात येईल अशी शक्यता नाकारता येणार नाही, याबाबत भाजपाच्या केंद्रीय पातळीवर बोलले जात आहे.

 

२०१४ मध्ये भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यावेळी भाजपकडे बहुमत नसल्यानं शरद पवारांनी भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. सत्ता स्थापनेसाठी भाजपला ७ दिवस लागले. त्यावेळी भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यावेळी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद होतं. फडणवीसांची निवड करत भाजप नेतृत्त्वानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण त्यावेळी एकनाथ खडसे, विनोद तावडे, नितीन गडकरी, पंकजा मुंडे यांची नावं शर्यतीत होती. तसेच महाराष्ट्रासोबतच हरियाणातही २०१४ मध्ये भाजपला सत्ता मिळाली. तिथे मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपनं ७ दिवसांपेक्षा अधिकचा वेळ घेतला. भाजप नेतृत्त्वानं मनोहर लाल खट्टर यांची निवड केली. त्यावेळी अनिल विज, रामविलास शर्मा यांची नावं आघाडीवर होती.

 

यापूर्वी  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. राज्यात पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळालं. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यास भाजपला ८ दिवस लागले होते. धर्मेंद्र प्रधान, मनमोहन सांबल यांची नावं आघाडीवर होती, त्यावेळी भाजपनं मोहन मांझी यांच्या रुपात आदिवासी चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी निवडला. त्यांचं नाव फारसं चर्चेत नव्हतं. तसेच भाजपला राजस्थानात २०२३ साली  सत्ता मिळाली. तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी ९ दिवस खल सुरु होता. अखेर भजनलाल शर्मा यांची निवड झाली. ते पहिल्यांदाच आमदार झाले होते. राजस्थान भाजपचे महासचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं. वसुंधरा राजे, किरोडीलाल मीणा यांच्यासारखे दिग्गज नेते स्पर्धेत असताना, त्यांची नावं चर्चेत असताना भजनलाल शर्मा यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं. तर २०२३ मध्ये भाजपनं मध्य प्रदेशात सत्ता राखली. त्यावेळी शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री होते. तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी शक्यता होती. पण त्यांच्या जागी मोहन यादव यांची निवड झाली. त्यांचं नाव शर्यतीत नव्हतं. त्यांच्या निवडीस भाजपनं ८ दिवसांचा अवधी घेतला होता.

 

भाजपनं छत्तीसगडमध्ये सत्ता मिळवली. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी रमण सिंह, अरुण साव यांची नावं आघाडीवर असताना भाजप नेतृत्त्वानं विष्णुदेव साय यांची निवड केली. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यासाठी भाजपला ७ दिवस लागले होते. २०१७ मध्ये भाजपनं उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकली. मनोज सिन्हा, केशव प्रसाद मौर्य यांच्यासारखे दिग्गज सीएम पदाच्या शर्यतीत होते. त्यावेळी भाजपनं योगी आदित्यनाथ यांची निवड साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी योगी गोरखपूरचे खासदार होते. त्यावेळी भाजपनं निर्णय घेण्यास ९ दिवस लावले होते. 

 

२०१७ मध्ये उत्तराखंडमध्ये भाजपला विजय मिळाला. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी भगतसिंह कोश्यारी, बी. सी. खंडुरी, रमेश पोखरियाल निशंक यांच्यासारखी मोठी नावं शर्यतीत होती. भाजपनं मुख्यमंत्र्यांची निवडीसाठी ८ दिवस घेतले. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याशिवाय २०१७ मध्ये हिमाचल प्रदेशात भाजपला सत्ता मिळाली. भाजपनं मुख्यमंत्री निवडण्यास ७ दिवसांचा अवधी घेतला. तिथे प्रेम धुमल, जे. पी. नड्डा यांची चर्चा असताना भाजपनं जयराम ठाकूर यांचं नाव जाहीर केलं होतं हा इतिहास आहे. दरम्यान, २०१९ मध्ये हरियाणात भाजपनं निकालानंतर ७२ तासांत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडेच पुन्हा नेतृत्त्व देण्यात आलं. २०२२ मध्ये गुजरातमध्ये भाजपनं निकालानंतर अवघ्या ४८ तासांत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला. तेव्हा विद्यमान मुख्यमंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती, हे लक्षात घ्यायला हवे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
dstuFOWSgBssq 28-11-2024 23:15:53

xtreme2day.com
vvLjuEtyTt 29-11-2024 18:45:57

xtreme2day.com
pRXHMAGSW 30-11-2024 13:10:28

xtreme2day.com
PsteKOvGAtHZS 01-12-2024 08:06:00

xtreme2day.com
PGqbTVxY 02-12-2024 01:50:06

xtreme2day.com
EDhBGqelblq 02-12-2024 17:32:26

xtreme2day.com
DHpmcEVeGkzFizR 02-12-2024 17:37:33

xtreme2day.com
lkqCtlVq 02-12-2024 17:44:55

xtreme2day.com
cWVgpDciZtAH 03-12-2024 11:59:18

xtreme2day.com
TrhyNxWpxfsDe 04-12-2024 06:28:56

xtreme2day.com
JNVZylAD 04-12-2024 21:23:53

xtreme2day.com
InDsRUJNMrfU 07-12-2024 06:34:18

xtreme2day.com
SmRiItvNHEpCe 08-12-2024 00:38:20

xtreme2day.com
fCQKYGqH 08-12-2024 18:04:39

xtreme2day.com
inCmCloqGLSUWt 09-12-2024 15:32:57

xtreme2day.com
vogmXFGKs 10-12-2024 13:33:43

xtreme2day.com
TGbSLnFrTcuS 11-12-2024 16:26:19

xtreme2day.com
xfrTBFAtWAFHZj 12-12-2024 20:05:29

xtreme2day.com
UEGvfYJyy 13-12-2024 23:56:41

xtreme2day.com
TyAvViVohhiEHlf 14-12-2024 21:10:19

xtreme2day.com
hHTNZoflzFyO 15-12-2024 16:29:12

xtreme2day.com
eSZjRnERLTzktEZ 16-12-2024 15:15:42

xtreme2day.com
fhhvdmKuNxUsgE 19-12-2024 02:57:18

xtreme2day.com
pYAyAieHI 20-12-2024 03:28:28

xtreme2day.com
LDvliTqimGsMF 21-12-2024 21:16:51

xtreme2day.com
zKEEIazxiEaoSZ 22-12-2024 16:04:00

xtreme2day.com
EsUIVPDBqzJDhUV 23-12-2024 10:24:35


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती