आज श्री कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ( ७२८ वे वर्ष.) संजीवन समाधी सोहळा दिन
जय हरी माऊली !
आज कार्तिक कृष्ण १३, गुरूवार
दिनांक--- २७/११/२०२४
श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीतर्फे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिना निमित्ताने श्री माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत !
।। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे अभंग पुढीलप्रमाणे-----*
*१)अष्टोतरशे वेळ समाधि निश्चळ।*
*पूर्वी तुझे स्थळ वहनाखाली।।१।।*
*उठविला नंदी शिवाचा ढवळा।*
*उघडिली शिळा विवराची।। २।।*
*आसन आणि धुनी मृगछालावर ।*
*पाहाती ऋषीश्वर वोसंडोनी।।३।।*
*बा माझी समाधि पहिली जुनाट ।*
*केवळ वैकुंठ गुह्यगोप्य ।।४।।*
*नामा म्हणे देवा पुरातन स्थान ।*
* *ऐसे नारायणे दावियेले ।। ५।।*
*----- श्री नामदेव महाराज म्हणतात,हे समाधीचे जुनाट स्थान माऊलींनी आम्हाला दाखविले हे पाहून नारा विठा गोंदा महादा यांना समाधिची जागा स्वच्छ करावयास सांगितली.*
*नारा विठा गोंदा महादा पाठविला ।*
*झाडविली जागा समाधिची ।।*
*नंतर हे सर्वजण वर आले यावेळी माऊलींची सर्वांनी षोडशोपचारे पूजा केली व कंठ वाटून येउन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर आले.*
*पूर्वी अनंत भक्त जाले ।*
*पुढे ही भविष्य बोलिले।।*
*परि निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले।*
*अपार जीवजंतु।।*
*नामा म्हणे भेटा लहान थोर सारे ।*
*जातो ज्ञानेश्वर समाधिसी।।*
* *श्री नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण श्री माऊलींना भेटा कारण श्रीमाऊली समाधिकडे जात आहेत. सर्वांना भेटल्यानंतर श्री माऊलींच्या एका हाताला श्री निवृत्तीनाथ व दुसऱ्या हाताला स्वतः श्री भगवान नारायण यांनी धरून माऊलींना समाधि स्थानावर बसविण्या साठी चालले.*
*देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर ।*
*जातो ज्ञानेश्वर समाधिसी।।*
*श्री ज्ञानदेव आता समाधीच्या आसनावर जावून बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे श्री ज्ञानेश्वरी ठेवली.नंतर श्री भगवंताने श्री ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात ठेवला नंतर दर्शन घेतले.त्यावर देव पुढे म्हणाले हे पहा जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत माऊलींची समाधी तोपर्यंत स्थिर राहिल.*
*जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी।*
*पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली।।*
*हस्त ठेविला माथया।*
*ज्ञानदेव लागे पाया ।।*
*विठोजी म्हणे लवलाह्या ।*
*समाधिस बैसावे ।।*
*देव म्हणे ज्ञानेश्वरा ।*
*चंद्र तारा जव दिनकरा ।।*
*तव तुम्ही समाधि स्थिरा ।*
*राहे तारा हे निरंतर ।।*
*श्री माऊलींनी तिन वेळेस आता नमस्कार करून डोळे झाकले.*
*त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली हे वर्णन करणे कठीण.*
*अशा परिस्थितीतही श्री भगवंतांनी सर्वांना कठिण अंतकरणाने बाहेर आणले व त्यास शिळा बसविली.**
*देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर ।*
*जातो ज्ञानेश्वर बैसावया ॥१॥*
*नदीचिया माशा घातलें माजवण ।*
*तैसे जनवन कालवलें ॥२॥*
*दाही दशा धुंद उदयास्तावीण ।*
* *तैसेंचि गगन कालवलें॥३॥*
*जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी ।*
*पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥*
*ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा ।**
*पादपद्मी ठेवा निरंतर ॥५॥*
*तीन वेळा तेव्हा जोडिलें करकमळ ।*
*झांकियले डोळे ज्ञानदेवें ॥६॥*
*भीममुद्रा डोळां निरंजन मैदान ।*
*झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव ॥७॥*
*नामा म्हणे आतां लोपला दिनकर ।*
*बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥*
*निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा ।*
*घातियेली शिळा समाधीसी ॥१॥*
*सोपान मुक्ताई सांडिती शरीरा ।*
*म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥*
*आणिकांची तेथे उद्विग्न ती मनें ।*
*घालिताती सुमने समाधीसी ॥३॥*
*नामदेवे भावे केली असे पूजा ।*
*बापा ज्ञानराजा पुण्यापुरुषा ॥४॥*
*जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दात.*
*।।ज्ञानियांचा राजा गुरू महाराव ।*
*ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥*
*मज पामरासीं काय थोरपण ।*
*पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥*
*ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे ।*
*इतर तुळणें काय पुढे ॥३॥*
*तुका ह्मणे नेणे युक्तीचिया खोलीं ।*
*ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥*
श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या आशिर्वादाने आपणा सर्वांना कल्याण होवो, आपणा सर्वांना सुख-समृद्धी, भरभराट लाभो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, आपणा सर्वांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच श्री माऊली चरणी प्रार्थना !
*जय जय श्री राम कृष्ण हरी !*