Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

राज्यात भाजपाची त्सुनामी! भाजपाची तब्बल १३६ जागांवर आघाडी, एनडीएला २३७ ठिकाणी यश !!

xtreme2day   23-11-2024 22:35:28   34568044

राज्यात भाजपाची त्सुनामी! भाजपाची तब्बल १३६ जागांवर आघाडी, एनडीएला २३७ ठिकाणी यश !!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - विधानसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर संपूर्ण भारतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाची या निकालात एकप्रकारची "त्सुनामी" दिसून येत आहे! एकूण २८८ विधानसभा जागांपैकी या एनडीएने २३६ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले असे दिसून आले आहे आणि त्यापैकी भाजपा १३७ जागा मिळवून सर्वात मोठा हक्कदार झाला आहे.

 विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अतिशय दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३६ जागांवर यश मिळवलं असून महाविकास आघाडी केवळ ४९ जागांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षानं सलग तिसऱ्यांदा शंभरचा आकडा पार केला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अतिशय दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं तब्बल २३६ जागांवर यश मिळवलं असून महाविकास आघाडी केवळ ४९ जागांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षानं सलग तिसऱ्यांदा शंभरचा आकडा पार केला आहे. भाजपनं महाराष्ट्रात पहिल्यांदाच १२५ चा आकडा ओलांडला आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही भाजपला असा पराक्रम करता आला नव्हता. त्यावेळी भाजपनं १२२ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपनं तब्बल १३७ जागांवर यश मिळवलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्रिपद भाजप आपल्याकडेच ठेवणार आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपचाच असेल. महायुतीत सध्या मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असा पॅटर्न आहे. तोच कायम ठेवण्यात येईल, अशी माहिती एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. सध्याच्या घडीला महायुतीत मुख्यमंत्र्यांच्या जोडीला दोन उपमुख्यमंत्री आहेत. नव्या सरकारमध्येही तशीच रचना असेल. पण मुख्यमंत्री भाजपचा असेल. तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे सरकारमधील प्रमुख पदं कायम राहणार आहेत. 

 

२०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात भाजप, शिवसेना युतीची सत्ता होती. त्यावेळी भाजपच्या १२२ जागा आलेल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात राज्यात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री झाला. ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते राज्यातील केवळ दुसरेच मुख्यमंत्री ठरेल. २०१९ मध्ये भाजप, शिवसेनेला बहुमत मिळालं. भाजपला १०५ जागा मिळाल्या. पण मुख्यमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांचं बिनसलं आणि उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली. ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. त्यामुळे भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागल होत. २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. भाजपच्या पाठिंब्यानं शिंदे मुख्यमंत्री झाले. सत्ता स्थापनेसाठी भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला मुख्यमंत्रिपदापासून दूर राहावं लागलं होतं.

मात्र विधानसभा निवडणुकीत भाजप ८० ते ९० जागांपर्यंत मर्यादित राहिली असती, तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद गेलं असतं. पण आता भाजपनं तब्बल १३७ जागांवर यश मिळाल्यानं कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे. बहुमताच्या आकड्याच्या जवळ गेल्यानं मुख्यमंत्रिपद सोडू नये, अशी नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हालचालींवरून स्पष्ट झाले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती