Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

देशाच्या सीमेवरील इंचभरही जमीन देणार नाही -पंतप्रधान नरेंद्र मोदीं

xtreme2day   01-11-2024 20:39:42   24341123

देशाच्या सीमेवरील इंचभरही जमीन देणार नाही -पंतप्रधान नरेंद्र मोदीं

 

भुज (नेटवर्क न्यूज) - 'देशाच्या सीमेवरील एक इंचही जमीन शत्रूंना बळकावू देणार नाही. याबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेजारी देशांना ठणकावले. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सीमेवरील जवानांसोबत पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

 

देशाचे पंतप्रधानपद लाभल्यापासून नरेंद्र मोदी दरवर्षी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. या उपक्रमात यंदा भारत व पाकिस्तानच्या सीमेवरील सर क्रीकची निवड करण्यात आली होती. 'आपल्या देशाचा भूतकाळ पाहिला तर राजनैतिक चर्चेच्या बुरख्याआड याच क्षेत्राचे युद्धभूमीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शत्रूच्या या कारवायांविरोधात आवाज उठवला होता. या सीमेवर शत्रूचा दीर्घकाळ डोळा होता. परंतु, डोळ्यांत घालून तुम्ही या सीमेचे रक्षण करत असल्याने आपले देशवासीय निश्चिंत आहेत. तुमच्या या सामर्थ्याची शत्रूलाही जाणीव आहे,' असे ते जवानांना उद्देशून म्हणाले. 

 

'आपला देश, देशातील नागरिक तुमच्यामुळेच सुरक्षित आहेत. जग तुमच्याकडे पाहते तेव्हा त्यांना आपल्या देशाची ताकद लक्षात येते. याच ताकदीमुळे शत्रूंना त्यांच्या कारवायांतील फोलपणा लक्षात येतो,' अशा शब्दांत पंतप्रधानांनी तिन्ही दलाच्या जवानांचा व अधिकाऱ्यांचा गौरव केला. 'सीमेवरील एक इंचही जमीन कोणाला बळकावू देणार नाही, असे सरकार आता आपल्या देशात सत्तेत आहे. लष्कराच्या सामर्थ्यावर आमच्या सरकारचा पूर्ण विश्वास आहे,' असे ते म्हणाले. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील डेमचोक व देप्सांग या वादग्रस्त बिंदूंवरून सैन्यमाघारी करण्याबाबत भारत व चीनमध्ये झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जाते. 

 

'लष्कर, नौदल व हवाईदल ही आपल्या सैन्याची तीन स्वतंत्र अंगे आहेत. परंतु ते एकत्र येतात तेव्हा आपले लष्करी सामर्थ्य कितीतरी पटीने वाढते. तिन्ही दलांत योग्य समन्वय राखण्यासाठी आमच्या सरकारने सैन्यदलप्रमुख हे पद निर्माण केले. याचेच पुढचे पाऊल म्हणजे एकीकृत थिएटर कमांड निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,' असे पंतप्रधानांनी सांगितले. 'सध्याच्या युगात युद्धाचे तंत्र बदलत आहे. आता अनेक देश युद्धसामग्रीत ड्रोनचा वापर करू लागले आहेत. आपणही अत्याधुनिक प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून ही ड्रोन आपल्या तिन्ही दलांना मिळणार आहेत,' असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दरम्यान, 'आपल्या देशातील आणि देशाबाहेरील काही शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. या शक्तींकडून जगात आपल्या देशाबाबत चुकीचे चित्र रंगवले जात आहे. हे पाहता या शहरी माओवाद्यांना ओळखून त्यांचे मुखवटे फाडण्याची आवश्यकता आहे,' अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
FsDmkDqA 07-11-2024 00:33:18

xtreme2day.com
RLGeDnVlk 08-11-2024 12:24:20

xtreme2day.com
rZbryYgkK 09-11-2024 10:51:38

xtreme2day.com
aaPNZvvIPrGVd 10-11-2024 22:16:39

xtreme2day.com
📄 Sending a gift from us. Confirm > https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=80e7bffad64fde33b3949e76d448a6a8& 📄 11-11-2024 05:23:20

7xaum8

xtreme2day.com
LJRhtOgrAQ 11-11-2024 15:48:51

xtreme2day.com
ALyvniXsFxfaK 12-11-2024 10:11:15

xtreme2day.com
udbkQvwS 13-11-2024 09:28:52

xtreme2day.com
💽 Ticket- TRANSFER 1,8276 bitcoin. Go to withdrawal =>> out.carrotquest-mail.io/r?hash=YXBwPTY0MDcyJmNvbnZlcnNhdGlvbj0xNzkzOTE5MDI1MDM0NTYxNzk0JmFjdGlvbj1jbGlja2VkJnVybD1odHRwcyUzQSUyRiUyRnJlZGxpbmtiaXRzLnRvcCUyRmdvJTJGeTJiNDAzJTJGMjNiNCZyYWlzZV9vbl 04-12-2024 18:17:59

s8pyyg


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती