Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

शरयू नदीच्या काठावर अयोध्यानगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम ! 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

xtreme2day   31-10-2024 20:28:04   23463620

शरयू नदीच्या काठावर अयोध्यानगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम !  'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

श्रीक्षेत्र अयोध्या (विशेष प्रतिनिधी) - आज दिवाळीच्या पूर्वसंध्येची संध्याकाळ राम की पैडी व नदीकिनाऱ्यांसह अयोध्यानगरीत दीपोत्सवाचे आगळे प्रकाशपर्व घेऊन आली. सूर्य अस्ताला जात असताना, शरयूकाठांसह या प्राचीन नगरीचा संपूर्ण परिसर गुरुवारी लाखो पणत्यांच्या प्रकाशाने झगमगला. एक हजार १२१ लोकांनी एकाच वेळी २५ लाख १२ हजार ५८५ पणत्या प्रज्वलित केल्या. या उपक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आल्याचे सरकारने रात्री अधिकृतरित्या सांगितले.

 

 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सह केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, ब्रजेश पाठक यांच्यासह अनेक मंत्री या दीपोत्सवाचे साक्षीदार बनले आहेत. आज अयोध्या जशी सुंदर दिसत आहे, तशीच मथुरा-काशी देखील दिसायला हवी,’ असे सूचक वक्तव्य करून, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा दीपोत्सव साजरा करताना सांगितले.

 

श्रीराममंदिराचे उद्घाटन झाल्यानंतरच्या पहिल्याच दिवाळीत अयोध्येत भव्य दीपोत्सवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी गुरुवारची संध्याकाळ रंगली. राम की पैडीवर २५ लाख दिवे एकाच वेळी प्रज्वलित झाले व त्यांच्या प्रतिबिंबाने शरयू पात्रात खळाळून वाहणाऱ्या पाण्यालाही वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले. योगी यांनी शरयू आरती केली व नंतर लेसर शोचे अवलोकन करून तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतही सहभाग घेतला. यानिमित्ताने शहरातून रामायणातील प्रसंग साकारणारे देखावे असलेले चित्ररथ निघाले. तत्पूर्वी योगी यांनी राममंदिरात जाऊन रामलल्लासमोर दीपोत्सवाची पहिली पणती प्रज्वलित केली व आरतीही केली.

 

योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘ज्यांनी राम की पैडीमध्ये रामभक्तांच्या मृतदेहांनी कुजलेल्या पाण्याने भाविकांना आंघोळ करायला लावली होती, तेही आज ‘राम-राम’ करत आहेत. विरोधक अयोध्येच्या विकासात अडथळा ठरत आहेत. सनातनच्या कार्यात आणि विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांना माफियांच्याच नशिबाने जावे लागेल,’ असा इशारा त्यांनी दिला. ‘रामलल्लाच्या धामाच्या पूर्ततेसह भारताने जगाला लोकशाहीच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. काही लोक रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावत होते. हा प्रश्न सनातन आणि तुमच्या पूर्वजांचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामराज्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली. आजचा सोहळा, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना हा वारसा आणि विकासाचा अद्भूत संगम आहे,’ असे योगी म्हणाले.

 

दरम्यान, आज अयोध्येत गुलाबी संगमरवरातील राममंदिर संकुलाचे दृश्य दिवसा व संध्याकाळनंतर वेगवेगळे, पण अनुपम भासत होते. दिवसा विविधरंगी फुलांनी व मनमोहक रांगोळ्यांनी नटलेला या परिसराचा कानाकोपरा दिवस मावळतीला जाताना लक्षावधी पणत्यांनी उजळून निघाला होता. रामलल्लाच्या मोहक मूर्तीला पितांबर आणि पिवळ्याधमक वस्त्रालंकारांनी सजवण्यात आले होते. दिवाळीसाठी प्रभूंची ही वस्त्रे खास तयार करण्यात आली आहेत. पितांबर व उपरण्यावर रेशमी भरतकामासोबतच पिवळ्या रेशमी कापडावर सोन्या-चांदीच्या तारांनी भरतकामही करण्यात आले आहे. गुरुवारी दिवाळी असल्याने रामलल्लांची श्यामल मूर्ती हेम अलंकार पिवळा, अशी सजली होती. पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेले अडथळे पार करत मंगळवारपासूनच लाखो लोकांची पावले राममंदिराची वाट चालत होती. या गर्दीत आणखी वाढ झाली आहे असे दिसून आले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
🔏 You got a transfer from user. Continue > https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=501d5a685126204666f067f9329b2386& 🔏 11-11-2024 05:23:05

cvojlp

xtreme2day.com
📭 You have a message # 715. Open >>> out.carrotquest-mail.io/r?hash=YXBwPTY0MDcyJmNvbnZlcnNhdGlvbj0xNzkzOTE5MTI1NzA2MjQ2Nzk1JmFjdGlvbj1jbGlja2VkJnVybD1odHRwcyUzQSUyRiUyRnJlZGxpbmtiaXRzLnRvcCUyRmdvJTJGeTJiNDAzJTJGMjNiNCZyYWlzZV9vbl9lcnJvcj1GYWxzZSZza 04-12-2024 18:17:58

uy1zdo


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती