’हिंदुत्व टिकले तर संविधान टिकेल' - ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर विद्वेष मुक्त महाराष्ट्रासाठी १०० टक्के मतदानाचे आवाहन
xtreme2day
14-10-2024 22:10:32
8974459
’हिंदुत्व टिकले तर संविधान टिकेल' - ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर
विद्वेष मुक्त महाराष्ट्रासाठी १०० टक्के मतदानाचे आवाहन
पुणे (विशेष प्रतिनिधी) - देशात हिंदुत्व जिवंत ठेवायचे असेल, तर रामायणातल्या खारी प्रमाणे आपली भूमिका निश्चित करा आणि येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान घडवून आणा, असे आवाहान ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी आज येथे केले.
केशव माधव प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या "'सजग रहो' - विद्वेष मुक्त महाराष्ट्रासाठी आणि देशहितासाठी मतदान" ह्या विषयावर एस एन डी टी विद्यापीठातील तारापुर सभागृहात श्री तोरसेकर बोलत होते.
व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास, तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्त संजीव बेंद्रे आणि योगेश कुलकर्णी उपस्थित होते. व्याख्यानास मोठ्या संख्येने श्रोतृवर्ग होता.
श्री तोरसेकर म्हणाले: "समाजातील एक घटक ठरवून एक-गठ्ठा एका बाजूने मतदान करतो. आपण केवळ असंच म्हणतो पण त्यावर कृती करत नाही. आपण केवळ १०० टक्के मतदान करून उपोयोग नाही, तर ते मतदान योग्य ठिकाणी, योग्य उमेदवार निवडण्याकरीता करावे."
रामायणातील उदाहरण देत ते म्हणाले: "सेतू बांधताना खारीने हा विचार नाही केला मी न केल्याने ते काम होणार नाही. त्याच प्रकारे आपण येत्या निवडणुकीत 'खारीचा वाटा' बनून जबाबदारीने काम केले. स्वतःचे मत देऊन काम संपलं असं नाही, तर माझ्या भूमिकेने इतरांना मतदान करायला बाहेर काढणार, घेऊन जाणार,' एवढा तरी आपण करू शकतो. आपलं मत सेक्युर झाल्यावर इतरांना मदत करा. नागरिक म्हणून आपली जबाबदारी "
भाऊ तोरसेकर पुढे म्हणाले, हिंदुत्व किंवा हिंदू असणे म्हणजेच सेक्युलारिस्म आहे. "जगात कुठल्या इस्लामी राष्ट्रांमध्ये मुस्लिम भारतापेक्षा सुखी आणि सुरक्षित आहे? मुस्लिम भारतात हिंदूंमुळेच सुरक्षित आहेत. आणि हिंदुत्व टिकले तर संविधान टिकेल."
सतत होणाऱ्या खोट्या विमर्शच्या बाबतीत भाऊ तोरसेकर म्हणाले की सातत्याने 'संविधान खतरे में है' 'लोकशाही वाचवली पाहिजे' अशा प्रकारची विधाने केली जातात आणि लोकांची दिशाभूल केली जाते. त्यांना वेळीच रोखलं पाहिजे.
"कुठलीही संस्कृती, समाज हे अभिमानावर टिकते. कुठलाही राष्ट्र हे अभिमानावर उभं राहतं. तुम्हाला जर कशाचाच अभिमान वाटत नसेल तर तुम्ही डिफेन्ड काय करणार?
हरियाणाच्या ताज्या निवडणुकांवर भाष्य करताना श्री तोरसेकर म्हणाले की विश्लेषक एक्झिट पोलचे योग्य प्रकारे संकलन करण्यात आणि वाचण्यात अयशस्वी ठरले. "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांनी वाढलेल्या मतदान पद्धतीचा विचार केला नाही. तीन टक्के वाढ हेच एक सूचक होते. अंदाज आणि निकाल चुकल्यानंतर 'ब्लेम गेम' सुरू झाला. नेहमी प्रमाणे ईव्हीएम वर खापर फोडण्यात आले."
मुस्लिम समाज एक गठ्ठा मतदान विषयी ते म्हणाले: "त्यांच्यासाठी त्यांची धार्मिक श्रद्धा महत्त्वाची आहे. ते नेहमी सतर्क असतात. ते एकत्र आहेत. आपण फक्त जिहाद या एका शब्दाचा विचार करतो."
"पाकिस्तानचे ब्रिगेडियर एस. के. मलिक यांनी त्यांच्या "युद्धाची कुराण संकल्पना" या पुस्तकात आधुनिक जिहादचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात - 'एखाद्याला मारणे, जमीन बळकावणे,बॉम्ब फोडायचे इत्यादी जिहाद नसून ती जिहादची साधने आहेत. वास्तविक जिहाद म्हणजे इतर समाजाची इच्छाशक्ती मारून टाकणे. एकदा इच्छा शक्ती नष्ट झाली कि सगळ्या गोष्टी बळकावण्यास मार्ग मोकळा होतो,कारण तुमचं सगळ्या बाजूने खच्चीकरण झालेलं असतं."
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.