xtreme2day 14-10-2024 12:57:29 9990955
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मोठा निर्णय! युनोमध्ये घेतली इस्रायलविरोधात भूमिका; भारतीय जवानांना लेबनॉनमध्ये पाठवणार नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - इस्रायल-लेबनॉन सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सेनेत भारतीय जवानांना पाठवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. शनिवारी लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत (यूएनआयएफिल) भारतीय सैनिक सामील झाले. त्याचवेळी इस्रायली लष्कराच्या कारवाईच्या विरोधात उभे राहिले. इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्र संघाचे दोन शांतीरक्षक जखमी झाले आहेत. लेबनॉनमध्ये शांतीसेनेत १२ पेक्षा अधिक देशांचे तब्बल १०,००० हून अधिक शांतीरक्षक तैनात आहेत. यात भारतीय सैनिकांची संख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. तब्बल ९०० भारतीय सैनिक या ठिकाणी तैनात आहेत. न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या भारताच्या स्थायी मिशनने एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतीसेनेत योगदान देणारा एक प्रमुख देश म्हणून भारत युनिफिलच्या ३४ लष्करी देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनाच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे. शांतता रक्षकांची सुरक्षा महत्वाची आहे. यूएनएससीच्या विद्यमान ठरावांनुसार शांती सेनेतील जवानांची सुरक्षा सुनिश्चित करायला हवी असे पोस्टमध्ये लिहिले आहे. दक्षिण लेबनॉनमधील नाकोरा येथील वॉचटॉवरजवळ इस्रायलने केलेल्या हल्ल्यात श्रीलंकेचे दोन शांतीरक्षक जखमी झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. गेल्या ४८ तासांत दुसऱ्यांदा या भागातील शांतीसैनिकांच्या मुख्य तळावर बॉम्बहल्ले करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाचे कर्मचारी आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी, असे या दलाने म्हटले आहे.
hs6ekb
v974j4