Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 वर्ल्ड न्यूज

पृथ्वीच्या आत 700 किलोमीटर अंतरावर प्रचंड मोठा महासागर ! अमेरिकेच्या शास्त्रज्ञानी शोधलं भूगर्भातील रहस्य !!

xtreme2day   11-10-2024 17:08:47   11342262

पृथ्वीच्या आत 700 किलोमीटर अंतरावर प्रचंड मोठा महासागर ! अमेरिकेच्या शास्त्रज्ञानी शोधलं भूगर्भातील रहस्य !!

 

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिका असे पाच महासागरांनी पृथ्वीचा मोठा पृष्ठभाग व्यापलेला आहे. याव्यतिरिक्त आणखी एका महासागराचा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. 

 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा महासागर एवढा मोठा आहे की पाचही महासागर एकत्र केल्यानंतर त्यापेक्षा तीनपट मोठा आहे. शास्त्रज्ञांना शोधलेला हा महासागर पृथ्वीच्या 700 किलोमीटर खाली आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या सहाव्या महासागराचा शोध लावला आहे. 

 

 पृथ्वीला प्रामुख्याने तीन थर आहेत. यापैकी सर्वात वरचा पातळ पृष्ठभाग, ज्यावर पाणी, माती, जीवन इत्यादी असतात, त्याला क्रस्ट म्हणतात. याच्या खाली खनिजांपासून बनवलेले आवरण आहे, जे सर्वात आतील आणि तिसऱ्या थरापर्यंत-गाभ्यापर्यंत जाते. गाभा द्रवपदार्थांनी भरलेला असतो असे म्हटले जाते. जेथे इतकी उष्णता असते की घन स्वरूपात काहीही अस्तित्वात नसते. पृथ्वीच्या आत 700 किलोमीटर अंतरावर महासागर कसा शोधला गेला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या कामात शास्त्रज्ञांनी सिस्मोग्राफची मदत घेतली. संपूर्ण अमेरिकेत सिस्मोग्राफची व्यवस्था करण्यात आली होती. या अशा तरंग आहेत, ज्या पृथ्वीच्या खाली खोलवर जाऊन आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेची माहिती देऊ शकतात. यामध्ये शास्त्रज्ञांनी 500 हून अधिक भूकंपांच्या झटक्यांचा अभ्यास केला. यावरून शास्त्रज्ञांना कळले की खडकांमध्ये पाणी आहे. याला  थेट महासागर म्हटले जाणार नाही, कारण हे पृथ्वीच्या भूगर्भात साचलेले पाणी आहे. हे पाणी पृथ्वीवर असलेल्या महासागरांची स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. जर हे पाणी पृष्ठभागावर असते, तर पृथ्वीवर फक्त पर्वतच जमीन म्हणून दिसले असते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती