xtreme2day 10-10-2024 00:44:13 43675646
उद्योग जगताचा तारा निखळला ! पदम विभुषण व जेष्ठ उद्योग पती रतनजी टाटा यांचे देहावसान ! मुंबई (विशेष प्रतिनिधी) - अत्यंत दुःखद वृत्त आहे! उद्योग जगताचा तारा निखळला आहे! पदम विभुषण व जेष्ठ उद्योग पती रतनजी टाटा यांचे देहावसान झाले आहे. मुंबई येथील बीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. रतन टाटा म्हणजे एक चैतन्य होते.सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे या विचाराने प्रेरित असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ते कायम मदतीला धावून जात असत. त्यांच्या कारकिर्दीत टाटा सन्स एक कुटुंब म्हणून देशातील सर्वात मोठी उद्योग क्षेत्रातील भरारी घेणारी संस्था म्हणून उभी राहिली. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून देशातील नागरिक पोरके झाले आहे अशी भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने देशाची अपरिमित हानी झाली आहे.
4628d0
8yp8de