xtreme2day 09-10-2024 20:09:45 37895722
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल केले; ब्रीच कँडीच्या ICU विभागात उपचार, प्रकृती गंभीर- रॉयटर्सचे वृत्त मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूह असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा (वय-८६)यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रॉयटर्स या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार रतन टाटा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, टाटा समूहाकडून रतन टाटा यांच्या प्रकृती संदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी स्वत:रतन टाटा यांनी एक्स वरून आपल्या प्रकृतीची काळजी करण्याची काही कारण नसल्याचे स्पष्ट केले होते. वय आणि प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. वयानुसार नियमीत तपासणीसाठी रुग्णालयात आल्याचे त्यांनी म्हटले होते. मेडिकल चेकअपसाठी भर्ती करण्यात आले असून माझ्या प्रकृती संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत, असे रतन टाटा यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.
3mttpi
b6t80o