xtreme2day 31-08-2024 17:59:32 2287581
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या आशिया खंडातील सर्वात लांब बोगद्याचे काम पूर्ण ! २०२५ मध्ये होणार खुला मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून प्रकल्पातील ८.९ किमी लांबीच्या बोगद्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. हा बोगदा आशिया खंडातील सर्वात लांब आणि रुंद असल्याचं प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. हा प्रकल्प मे २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ आणि अंतर कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी व या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी हा प्रकल्प २०१९ मध्ये हाती घेतला होता. या प्रकल्पाचे काम जवळपास ८९ टक्के पूर्ण झाले आहे. खोपोलीपासून लोणावळ्यातील कूसगाव बाहेर जाण्यासाठी दुहेरी बोगदा बांधला जात आहे, ज्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर केबल-स्टेड ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल. संपूर्ण प्रकल्प एमएसआरडीसी द्वारे राबविण्यात येत आहे. ज्यावर दोन खाजगी एजन्सी कार्यरत आहेत. सुमारे १३.३ किमी लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत १.६७ किमी आणि ८.९२ किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पासाठी जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मिसिंग लिंकवर सर्वात उंच पूल आणि रुंद बोगदा बांधण्यात येत आहे. हा बोगदा अशीया खंडातील सर्वात मोठा आणि रुंद बोगदा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकदा लोकांसाठी उघडल्यानंतर या मिसिंग लिंकवरून प्रवास करण्यासाठी इतर कोणताही टोल भरावा लागणार नाही. प्रकल्पाची माहिती देताना, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता आणि प्रकल्प प्रमुख राकेश सोनवणे यांनी दिली. ते म्हणाले, "खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हा सध्याचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सेक्शन १९.८ किमीचा आहे. जो आता १३.३ किमी होईल. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर ६ किमीने कमी होणार आहे. तर प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे. केबल-स्टेड पूल हा ६५० मीटर लांबीचा असून या खांबाची उंची १८० मीटर आहे. खांबांमधील अंतर ३०५ मीटर आहे. खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट हा सध्याचा १९ किमीचा एक्स्प्रेस वे एक 'झिरो फॅटल इटी कॉरिडॉर' बनवण्यासाठी आणि उतार आणि घाटाचा भाग टाळण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे,' असे अधिकारी म्हणाले. महामार्गावर प्रत्येक दिशेने. यापैकी एका बोगद्याची लांबी ८.८७ किमी आहे. तसेच दुसऱ्या बोगद्याची लांबी १.६७ किमी आहे. आणि या बोगद्यांचे ९८ टक्के पूर्ण झाले आहे; आता फक्त सिस्टीमवर काम सुरू आहे. बोगद्याच्या आतील भागाचे काम वेगाने सुरू आहे. हे बोगदे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी खोपोलीकडे दोन पूल बांधले जात आहेत. त्यापैकी १.८ किमी लांबीचा पूल पूर्ण झाला आहे. तर ९५० मीटर लांबीच्या केबल-स्टेड पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. या पुलाचे ६० ते ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर संपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.