Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा मोठ्या प्रमाणात हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री; सप्लिमेंट्सचे सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात युवकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम!

Xtreme Today   20-11-2026 22:07:59   119639118

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा मोठ्या प्रमाणात हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री; सप्लिमेंट्सचे सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात युवकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम!

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - तरुणाईमध्ये जीम आणि बॉडी बनवण्याची क्रेझ वाझली आहे. त्याचा फायदा घेऊन काही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा मोठ्या प्रमाणात हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री केली जात असल्याचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे यामध्ये कोणताही वैद्यकिय सल्ला नसतो. त्यामुळे या सर्व सप्लिमेंट्सचे सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात युवकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. या सर्वावर आता चाप बसवण्यासाठी नियमावलीचे उल्लंघन केल्यास 5 लाख रुपयांपर्यंत दंड दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड परवान्याविना व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड सप्लिमेंट्सच्या सेवनाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास थेट जन्मठेपेची शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.

 

 

एफ डी ए चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भातली नियमावली घोषित केली आहे. प्रोटीन पावडर, मल्टी-व्हिटॅमिन गोळ्या, वजन घटवणाऱ्या गोळ्या, क्रीडा पूरक आहार आणि हर्बल प्रोडक्ट या सर्वांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे पण यामध्ये मूळ पदार्थ हा वेगळाच असतो आणि त्याची विक्री ही वेगळ्या नावाने होते, असा धक्कादायक प्रकार अलिकडील 13 नोव्हेंबर रोजीच्या कारवाईतून समोर आला असल्याचे तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले. उत्पादक, पुरवठा करणारे, वितरक, आयात करणारे, मेडिकल स्टोर्स, जिम आणि हेल्थ सेंटर्स या सर्वांना या नियमावलीला फॉलो करावे लागेल, या सर्वांकडे आता एफडीएचा परवाना असणं गरजेचं आहे. त्याशिवाय केलेली कोणतीही प्रक्रिया हे नियमाचं उल्लंघन ठरणार आहे.

 

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स हे सध्या सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून वजन घटवणे, चेहरा उजळवणे, ग्लो आणणे यासाठी सोप्या टीप्स देत उघडपणे खोटे दावे करतात. लहान मुलं, गर्भवती माता, रुग्ण आणि खेळाडू हे सर्व पदार्थ कोणताही विचार न करता ते सेवन करतात आणि मग आरोग्याची समस्या उद्भवते. पण आता या सर्वांवर मोठी कारवाई करण्यात येणार आहे. दिशाभूल करण्यात येणाऱ्या जाहिरातींवर कडक कारवाई होईल, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती