Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा १६ नोव्हेंबरला मेळावा

Xtreme Today   10-11-2026 23:06:44   9139619

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचा १६ नोव्हेंबरला मेळावा                                   

 

 अलिबाग (प्रतिनिधी) - राष्ट्रीय पत्रकार  दिनानिमित्त १६ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि सभासदांचा एक मेळावा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे सांबरी येथील वात्सल्य निसर्गोपचार केंद्रात  साजरा करणार असल्याची माहिती सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनचे  विश्वस्त तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी दिली आहे. 

 

 

या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकारांना महाराष्ट्र शासनाची अधिस्वकृतिपत्रिका, सन्मान मानधन योजना व शंकरराव चव्हाण  ट्रस्टच्या आरोग्य सुविधांबाबत  महाराष्ट्र शासनाचे ठाणे व रायगड जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज सानप हे मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दोन चाकी व चार चाकी वाहनांच्या वापराबाबत व सुरक्षेवर रायगड पोलीस वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री.सचिन पवार हे करणार आहेत.

 

 पत्रकारांच्या पाल्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी  अल्कलाइन शुद्ध पाणी व्यवसाय प्रकल्प बाबत असोसिएशनचे कृषी सल्लागार - कृषी तज्ञ श्री. संतोष पाटील,  वात्सल्य वृद्धाश्रम आणि गोशाळेचे मालक हे माहिती देणार आहेत,  त्याशिवाय श्री. शिवाजीराव चमकिरे, फिलगुड स्टार्ट अप संस्थापक आणि सीएमडी पुणे, श्री. निलेशजी छडवेलकर, ग्रोविंग डॉट एज्युकेशनल स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट व्यावसायिक संधी बाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजचे संस्थापक आणि सीएमडी पुणे, तसेच गुंतवणूक सल्लागार, प्रोफेशनल एलएम इन्व्हेस्टमेंट स्टार्टअप मार्गदर्शन श्री. गुणेश कुलकर्णी, रिजनल मॅनेजर एसबीआय लाइफ, पश्चिम महाराष्ट्र, आणि  एज्युकेशनल स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट व्यावसायिक संधीबाबत श्री. भूषण ओझर्डे, संस्थापक अध्यक्ष, ओझर्डे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे याचे बहुमोल मार्गदर्शन देण्यात येणार आहे. 

 

 ज्येष्ठ पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी संस्था करीत असलेल्या विविध कार्याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. मिलिंद वैद्य हे देणार असून संस्थेच्या माध्यमातून करीत असलेल्या माध्यम-कर्मी ज्येष्ठ पत्रकारांना आनंदाचे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनने हाती घेतलेल्या कार्याची माहिती,  प्रगतीचा अहवाल आणि पदाधिकारी नेमणुकीची घोषणा संस्थेचे सरचिटणीस श्री. संजयकुमार जोशी विस्तृतपणे देणार आहेत. 

 

पत्रकार सदस्यांसाठी विनामूल्य सल्ला म्हणून न्यायालयीन कामकाज  कशा प्रकारे केली जातात याची माहिती संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट ओमकार माने आणि ऍडव्होकेट सुनील रावडे हे मार्गदर्शन करणार आहेत.

 

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तसेच रायगड जिल्ह्यातील विना व विद्यमान आधी स्वीकृती धारक, प्रिंट मीडिया, मान्यताप्राप्त यूट्यूब चैनल संपादक, इलेक्ट्रॉनिक्स व डिजिटल मीडिया पत्रकार व पत्रकारेतर ज्येष्ठ पत्रकारांनाही आमंत्रित करण्यात आले असून त्याचे नियोजन, व्यवस्थेसाठी आपण कृपया श्री. प्रदीप पाटील उरण, रायगड जिल्हा अध्यक्ष  मो.8850057436 यांच्याकडे नोंद शनिवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ सायंकाळ पर्यंत  करावी असे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी कळविले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती