ज्येष्ठ पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त एकत्र येऊ या - प्रा.डॉ.जयपाल पाटील
Xtreme Today
01-11-2026 21:22:55
19387408
ज्येष्ठ पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त एकत्र येऊ या - प्रा.डॉ.जयपाल पाटील
अलिबाग : माध्यमांतून निवृत्त झाल्यानंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांचे खूप हाल होतात. राज्य शासनाची अधिस्विकृति पत्रिका आणि तात्पर्याने सन्मान मानधन मिळत नसल्यामुळे हाल तर होत आहेत. तसेच, इतर काही उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. मान-सन्मानाचीही वाट लागली आहे.
प्रसारमाध्यम आणि पत्रकार देशाचा चौथा स्तंभ आहे, तरीसुद्धा आर्थिक उन्नतीचा मार्ग नसल्याने ज्येष्ठ पत्रकारांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. अलिकडेच महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ पत्रकारांनी देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे इच्छा मरणाचा १७ जणांनी अर्जही दाखल केला, ही महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांची सध्याची दुर्दैवी स्थिती आहे.
सिनिअर जर्नालिस्ट असोसिएशनने या प्रश्नांचा तडा लावण्यासाठी येत्या राष्ट्रीय पत्रकार दिन १६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि सभासदांची महत्त्वाची बैठक 'वात्सल्य निसर्ग पर्यटन केंद्र' महादू नगर, सांबरी, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे आयोजित केली असल्याची माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी दिली.
'असोसिएशन'च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या कार्यपद्धतीवर अधिस्विकृती पत्र आणि सन्मान मानधनासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. तसेच, प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेगळे व उत्तम प्रकारचे उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतील, अशा काही महत्त्वाच्या विषयांवर माहिती व रूपरेषा आखण्यात आली आहे. जे सभासद या बाबतीत काही कार्यासाठी त्यांचा वेळ देण्यास तयार आहेत, त्यांच्यासाठी काही स्रोत आपण उभे करणार आहोत. त्यात कोणतीही गुंतवणूक न करता तातडीने सुरू करता येतील, असे काही ऊपक्रम या बैठकीस उपस्थित राहणाऱ्या पत्रकार आणि पत्रकारेतर व्यक्तींसाठी प्रात्यक्षिक व माहितीसाठी सादर करण्यात येणार आहेत. ज्यांना यात आवड व आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून कार्यरत होण्याची इच्छा आहे, अशा व्यक्तींची नोंदणी केली जाणार आहे. याशिवाय त्यांच्या मुला-मुलींकरीता उपयुक्त तांत्रिक, व्यावसायिक, उद्योग व्यापार व आजच्या काळातील शैक्षणिक उपक्रमा (उदा.एआय, स्टार्टअप) बद्दलची माहिती दिली जाणार आहे. आपल्या असोसिएशनचे शैक्षणिक व विकास सल्लागार व संचालक श्री.भूषण ओझर्डे याठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकारांच्या मुला-मुलींना सरकारी नोकऱ्यांमध्ये लागणारे विविध कोर्सेसचे शिक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचीही माहिती दिली जाणार आहे.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दि. 16 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार होते. मात्र, राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे हे अधिवेशन बुधवार दि. 6 जानेवारी,2027 रोजी दर्पण दिनानिमित्त पुणे येथे होणार आहे, यामध्ये भारतातील ज्येष्ठ नेते व मंत्री, मुद्रित,ऑनलाईन आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतील तज्ञ, संपादक-पत्रकारांची व्याख्याने, ज्येष्ठ महिला व पुरुष पत्रकारांचा विशेष सन्मान, याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांच्या विविध मागण्या सूचना, वर्तमान आणि भविष्यातील काही उपाययोजनांचा आढावा व ठराव मांडण्यात येणार आहेत. या भरगच्च अधिवेशनाची स्वतंत्र निमंत्रण पत्रिका दिली जाणार आहे, कृपया याचीही नोंद घ्यावी.
सहकारी बंधूंनो, पत्रकार बांधवांच्या सद्य परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा आणि दखल घ्यावी असे कार्य दैनंदिन व्यवहारातून सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केले जात आहे. पत्रकारांच्या अडचणी व मार्गदर्शनासाठी, समजावून घेण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, १९१, आराम नगर, स्टुडिओ बंगला पार्ट २, अंबा माता मंदिरासमोर, वर्सोवा अंधेरी वेस्ट येथे असुन तेथे व्यवस्थापक श्री.अमित जयस्वाल मो. 83829 14882 कार्यरत आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र कार्यालय - अ/10,पहिला मजला, एक्स्ट्रीम न्यूज इंडिया, स्वरूप कॉम्प्लेक्स, म्हात्रे पुलाजवळ, म्हसोबा चौक, नळस्टॉप रोड, एरंवडणे,पुणे येथे आहे. त्यासाठी संपर्क श्री.मिलिंद वैद्य राष्ट्रीय उपाध्यक्ष व पुणे जिल्हा अध्यक्ष 98507 78200. ज्येष्ठ पत्रकारांना कायदेशीर सल्ला हवा असल्यास ॲड.ओमकार माने मो. 99758 45247 आणि ॲड.सुनिल रावडे मो. 98502 48155 यांच्याकडे सल्ला मिळेल.
आपल्या असोसिएशनच्या जास्तीत जास्त सभासदांनी येत्या सोमवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सांबरी, ता. अलिबाग येथे आपल्या महत्वाच्या अशा बैठकीसाठी येणाऱ्यानी आपली नोंदणी असोसिएशनचे कृषी विषयक सल्लागार श्री.संतोष पाटील, सांबरी मो.9324592129 तसेच सरचिटणीस श्री.संजयकुमार जोशी मो. 9307895379 आणि खजिनदार श्री.चंद्रकांत कांबळे, मो. 89755 56839 यांच्याकडे कळवावी, असे आवाहन डॉ.जयपाल पाटील यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.