Xtreme Today 31-10-2026 19:19:29 551668689
नाशिक सिंहस्थ कुंभ मेळ्यात महागंगा आरतीचा सोहळा रंगला, 6,500 आदिवासी बांधवांचा सहभाग, गिनिज बुकात होणार नोंद श्रीक्षेत्र नाशिक सिंहस्थ कुंभमेळा (वे. शा. सं. रवींद्र कुलकर्णी गुरुजी याजकडून) - महाराष्ट्रातील सर्वात पवित्र अशा समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ मेळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने आज दुपारी 12.02 वाजता झाली. या सोहळ्याला भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सनातन धर्म श्रद्धेचे महापर्व मानले जाते. दोन वर्षे हा सोहळा रंगणार असून या सोहळ्यात आज महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक मध्ये आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. कुंभमेळ्याच्या या पवित्र स्थानी आज साडेसहा हजार आदिवासी महिला आणि पुरूष भाविकांनी या गंगा महाआरतीमध्ये सहभाग घेतला. यावेळी संपूर्ण वातावरण धार्मिक आणि पवित्रमय झाले होते. या नयमरम्य सोहळ्याची नोंद गिनीज बुकमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संस्कृतीची थोरवी गाणारा हा सोहळा हिंदू धर्मियांच्या सर्वात मोठा धार्मिक सोहळा असून यातील स्नानाला खूप महत्व आहे.