Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

कर्जतमधील वृक्षतोडीच्या प्रकरणावर सयाजी शिंदे यांनी घेतली पत्रकार परिषद; राज्य सरकारला दिला थेट इशारा

Xtreme Today   26-10-2026 20:46:16   37654434

कर्जतमधील वृक्षतोडीच्या प्रकरणावर सयाजी शिंदे यांनी घेतली पत्रकार परिषद; राज्य सरकारला दिला थेट इशारा

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कर्जतमधील वृक्षतोडीच्या प्रकरणावर सयाजी शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.

 

राजकीय दबावाखाली जीआर काढून राखीव किती तरी हजार एकर जमीन घेतली जात आहे. नंतर सगळं संपवलं जात आहे. जुन्या झाडांना हात न लावता विकास करता आला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे ही लोकशाही आहे. हे नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे का? मग तुम्ही आमच्यावर दबाव टाकू नका. आम्हाला फसवू नका, लोकशाही आहे की नाही आहे? आता आम्ही एक सेव्ह सह्याद्री नावाने एक मोहीम सुरू केली आहे. त्यात अनेक लोक तयार झाली आहेत. त्यातील काही तज्ञ मंडळी घेऊन सरकारकडे जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 

 

तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरंट पॉवर प्रकल्पासाठी ३२ हजार झाडे तोडण्याच्या निर्णयावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची टीका विरोधक करत आहेत. विवेकानंद पाटील यांनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला असून, सह्याद्रीच्या नैसर्गिक वारशाचे रक्षण करण्याची मागणी केली आहे. कर्जत तालुक्यात टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी तब्बल 32 हजार झाडांची कत्तल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रस्तावित वृक्षतोडीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. आता एमपीएससी आंदोलनातून चर्चेत आलेले विवेकानंद पाटील यांनीही या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे. 

 

दरम्यान, भिमाशंकर परिसरात ६०० एकरावर जलविद्युत प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरु झाली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी या प्रकरणात सरकारवर टीका केली आहे. या प्रकरणात मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सह्याद्रीच्या कुशीत निवडक सक्रियता का ? असा सवाल केला आहे. लव्हासा आणि ‘अँबी व्हॅली सिटी’ झाली तेव्हा आंदोलने झाली नाहीत, आता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विद्युत प्रकल्प राबवला जात आहे तर त्याला विरोध का असा सवालच बोर्डीकर यांनी सोशल मीडियावर केला आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती