Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये आर्थिक मदत, 40 नवीन तालुक्यांचा दुष्काळात समावेश, हमी भावाने चारा खरेदी आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची सोय - मुख्यमंत्री

Xtreme Today   14-10-2026 22:52:06   473651983

दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये आर्थिक मदत, 40 नवीन तालुक्यांचा दुष्काळात समावेश, हमी भावाने चारा खरेदी आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची सोय - मुख्यमंत्री 

 

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत केले जाणार आहे. राज्य सरकार त्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये आर्थिक मदत, 40 नवीन तालुक्यांचा दुष्काळात समावेश, हमी भावाने चारा खरेदी आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची सोय या प्रमुख घोषणांचा यात समावेश आहे. अवैध पाणी उपसा थांबवून शाळा फी माफीचेही निर्देश दिले आहेत, ज्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

 

दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच 5 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याच बरोबर फडणवीस यांनी आणखी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे दुष्काळी तालुक्यात आणखी 40 नव्या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरं म्हणजे, रब्बी हंगामात चाऱ्याची लागवड करणाऱ्या किंवा चाऱ्याचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सरकार चारा हमी भावाने खरेदी करणार आहे. तिसरं म्हणजे, दुष्काळी भागाला लागतील तेवढे टँकर्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधताना ही घोषणा केली. राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर काही तालुक्यातून तक्रारी आल्या होत्या. आता पुन्हा संपूर्ण ट्रिगर वन आणि ट्रिगर टूचा आढावा घेऊन 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे दुष्काळी तालुक्यात आणखी 40 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे, त्या भागाला दुष्काळाच्या 12 सवलती देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते संवाद साधत होते.

 

चाऱ्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करत आहोत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही चाऱ्याचा आढावा घेतला आहे. काही भागात चाऱ्याची 90 दिवसाची उपलब्धता आहे. काही भागात सहा ते सात महिन्याची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चारा उपलब्ध झाला पाहिजे, असा आमचा प्रयत्न सुरू आहे. धरण क्षेत्र परिसरात चाऱ्याची लागवड करण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्यांच्या विहिरीला पाणी आहे, त्यांनी रब्बी हंगामात ज्वारीचं पीक घ्यावं किंवा चाऱ्याची पिकं घ्यावीत. चाऱ्याची पिकं घेतली किंवा चाऱ्याची लागवड केल्यास सरकार सर्व चारा हमी भावाने विकत घेणार आहे, तशी आज आमची चर्चा झाली आहे. त्यासाठी लवकरच निर्णय करून घोषणा केली जाईल. रब्बीच्या हंगामात चाऱ्याची पिकं किंवा चारा झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे, असं फडणवीस म्हणाले.

 

पिण्याच्या पाण्यासंदर्भात टँकरची संख्या वाढत आहे. मराठवाड्यात बहुतेक भागात ऑब्सर्व्हेशन वेलमध्ये पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा खाली गेली आहे. जेव्हा पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा कमी असते, तेव्हा आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून टँकर लावावा लागतो. त्यामुळे आम्ही टँकर देत आहोत. लागतील तेवढे टँकर देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, या टँकर्सवर जीपीएस पद्धतीने ट्रॅकिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी पिण्यासाठी राखून ठेवायचं आहे. त्यामुळे 16 हजार बेकायदा नळ कनेक्शन कापलं आहे. यापुढेही जर अवैध पाणी उपसा केला तर त्याचं कनेक्शन कापलं जाणार आहे. हा अत्यंत कठोर निर्णय आहे. पण पिण्याचं पाणी राखून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

शालेय फी माफीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. फी माफीचा जीआर काढला होता. पण 1992पासून त्या जीआरमध्ये काही अटी होत्या. त्यामुळे त्याचा सर्वांना फायदा होत नव्हता. ही गोष्ट लक्षात आल्यावर त्या अटी काढल्या आहेत. सरसकट निर्णय लागू केला आहे. जिल्हा बँका असतील, सोसायट्या असतील सर्वांना कडक आदेश दिले आहेत. कुणालाही तगादा लावू नका. काही लोकं अतिउत्साह दाखवत आहेत. त्यांनी अति उत्साह दाखवू नये, असे आदेश दिले आहेत. खासगी बँकांशीही चर्चा सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती